नवीन राष्ट्रीय महामार्ग जाणार २५ गाव शिवारांतून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2018 10:19 PM2018-09-24T22:19:11+5:302018-09-24T22:19:30+5:30

मनसर- तुमसर- सिवनी या राष्ट्रीय महामार्गाला हिरवी झेंडी मिळाली असून जमीन अधिग्रहित करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला प्राप्त झाले आहे. हा महामार्ग तुमसर तालुक्यातील आठ आणि मोहाडी तालुक्यातील १७ गावातून जाणार आहे. डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.

The new national highway will go through 25 villages | नवीन राष्ट्रीय महामार्ग जाणार २५ गाव शिवारांतून

नवीन राष्ट्रीय महामार्ग जाणार २५ गाव शिवारांतून

googlenewsNext
ठळक मुद्देमनसर ते सिवनी महामार्ग : तुमसरच्या बायपासला हिरवी झेंडी, मोहाडीतील १७ तर तुमसरमधील ८ गावे

मोहन भोयर।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मनसर- तुमसर- सिवनी या राष्ट्रीय महामार्गाला हिरवी झेंडी मिळाली असून जमीन अधिग्रहित करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला प्राप्त झाले आहे. हा महामार्ग तुमसर तालुक्यातील आठ आणि मोहाडी तालुक्यातील १७ गावातून जाणार आहे. डिसेंबर महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती आहे.
रस्ते विकासाचे सशक्त माध्यम असून केंद्र सरकारने नवीन राष्ट्रीय महामार्ग घोषित केले. त्यात मनसर - रामटेक - तुमसर - तिरोडा - गोंदिया - बालाघाट व सिवनी असा हा राष्ट्रीय महामार्ग ७५३ राहणार आहे. भूसंपादनासाठी सक्षम भूसंपादन अधिकारी म्हणून तुमसर येथील उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
मोहाडी व तुमसर तालुक्यातील हा नवीन राष्ट्रीय महामार्ग जात आहे मोहाडी तालुक्यातील नवेगाव, हिवरा, वासेरा, पांझरा, बोडी, कांद्री, जांब, धोप, नेरला, सालईखुर्द, उसर्रा, काटेबाम्हणी, सालईबुज, विहिरगाव, देव्हाडा बु., देव्हाडा खु., नरसिंगटोला आणि तुमसर तालुक्यातील खापा, मांगली, तामसवाडी, तुडमा, स्टेशनटोली, देव्हाडी, माडगी व चारगाव अशा २५ गावातून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार या गावातील शेती भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आहे. येत्या चार वर्षात सदर राष्ट्रीय महामार्गाचे बांधकाम पूर्णत्वास जाणार आहे. हा संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग सिमेंटचा राहणार असून चौपदरी आहे. सध्या सदर रस्ता राज्यमार्ग असून डिसेंबर ते जानेवारी दरम्यान या कामाला सुरुवात होणार आहे.
तुमसर ते देव्हाडी पाच किमी रस्ता सिमेंटने बांधण्यास मंजुरी प्राप्त झाली आहे. हा रस्ताही चौपदरी राहणार आहे. आॅक्टोबरपर्यत रस्त्याचे मोजमाप व अंतिम कागदपत्र पूर्ण केली जाणार आहे. सदर रस्ता तहसील कार्यालय सारंगा टॉकीज, मुक्ताबाई शाळा, मशीद असा राहणार आहे. मेहगाव रस्ता ते सिहोरा रस्ता अशा बायपास मंजूर झाला असून भूमी संपादनाचे काम ७५ टक्के झाले आहे.
भूमी संपादनासाठी एक कोटी ९० लाख रुपये मंजूर झाले आहे. भंडारा रोड ते मऱ्हेगाव फाटा बायपास रस्ता रेल्वे रुळामुळे रखडला आहे. त्यामुळे शहरातून जड वाहने जाण्याची शक्यता आहे. बायपास रस्त्याचे कामे २००८ पासून रखडले होते. मार्च २०१८ च्या अंदाजपत्रकात ते पूर्णत्वास येण्याची शक्यता आहे. या राष्ट्रीय महामार्गामुळे तुमसर आणि मोहाडी तालुकाही राष्ट्रीय नकाशावर येणार असून यामुळे विकासाच्या वाटा खुल्या होतील.

नवीन राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला असून त्या अनुषंगाने कामांचा धडाका सुरु होणार आहे. तुमसर शहराला बायपास रस्ता सिहोरा, मोहगाव फाटा, भूसंपादनाची कामे पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. देव्हाडी रस्ता मंजूर आहे. डिसेंबर ते जानेवारी महिन्यात कामाला सुरुवात होईल.
-आर. एफ. खंडेलवाल
उपविभागीय अभियंता सार्व. बांधकाम विभाग तुमसर

Web Title: The new national highway will go through 25 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.