महाराष्ट्र एक्स्प्रेसला नवे सात जनरल डबे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 10:13 PM2018-02-14T22:13:41+5:302018-02-14T22:14:15+5:30
गोंदिया रेल्वे स्थानकातुन सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गोंदिया ते नागपूरला नवीन सात जनरल डबे लावण्याचे आश्वासन डीआरएम गुप्ता यांनी आज माजी खा. शिशुपाल पटले यांना दिले.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : गोंदिया रेल्वे स्थानकातुन सुटणाऱ्या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये गोंदिया ते नागपूरला नवीन सात जनरल डबे लावण्याचे आश्वासन डीआरएम गुप्ता यांनी आज माजी खा. शिशुपाल पटले यांना दिले.
या मागणीचे निवेदन प्रवाशी संघटनेने शिशुपाल पटले यांना दोन दिवसापूर्वी दिले होते. सोबतच महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये कायमस्वरुपी दुध वाहतुकीसाठी स्वतंत्र डबा देण्यात आला असुन त्या डब्यावर दुध वाहतुकीसाठी डबा असा फलक लावण्यात येणार असल्याचे डिआरएम गुप्ता यांनी यावेळी सांगीतले.
गोंदिया-भंडारा जिल्ह्यातील असंख्य गोरगरीब प्रवाशी महाराष्ट्र एक्सप्रेसने दररोज गोंदिया ते नागपूर असा प्रवास करीत असतात. मात्र, एकच जनरल डबा असल्यामुळे प्रवाशांना अनेकदा अपमानास्पद वागणूक सहन करावी लागत आहे. जनरलचे डबे अपुरे पडत असल्याने पासधारक तसेच गरीब प्रवाशी कुठल्याही डब्यात जाऊन बसतात. त्यामुळे अनेकदा पोलिसांचे दंडूके खावे लागते तसेच अधिकाºयांच्या दंडात्मक कारवाईला पुढे जावे लागते.
धावपळीत अनेकदा लहान-मोठे अपघात सुद्धा घडतात. काही दिवसापूर्वी एका प्रवाशाला आपला जिवही गमवावा लागला. तसेच या एक्सप्रेसमध्ये असलेले स्लिपर कोच डब्यात नाममात्र प्रवाशी प्रवास करतात.
अनेकदा हे डबे खाली असतात. स्लिपर कोचचे तीन डबे जनरल डबे म्हणून वापरण्यात यावे, असे रेल्वे बोर्डाचे आदेश होते. परंतु, आदेशाची अंमलबजावणी होत नव्हती. गोंदिया ते नागपूर या प्रवासात गोरगरीब प्रवाशांना सन्मानाने प्रवास करता यावा, याकरिता प्रवाशी संघटनेच्या वतीने डबे वाढविण्याच्या मागणीचे निवेदन शिशुपाल पटले यांना दोन दिवसापूवीं दिले होते. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन पटले यांनी आज डिआरएम गुप्ता यांची भेट घेतली.
दुध वाहतुकीसाठी असलेल्या डब्यावर खडुने लिहीले जात होते. त्या डब्यावर दुध वाहतुकीसाठी डबा असे नामफलक लावण्यात यावे आणि जनरलचे सात डबे लावण्यात यावे, तसेच तुमसर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्मवर जाण्यासाठी एकच पुल असल्याने प्रवाशांना आपले सामान घेऊन जातांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे तुमसर प्लॅटफार्मवर जाण्यासाठी आणखी एका पुलाची निर्मीती करण्यात यावी, यावर पटले यांनी डिआरएम गुप्ता यांच्याशी चर्चा केली.
यावर स्लिपर कोचच्या पाच डब्यांवर गोंदिया ते नागपूर व नागपूर ते गोंदिया जनरल असे नामफलक लावण्यात येतील, यामुळे गोंदिया ते नागपूर तसेच नागपूर ते गोंदिया या दरम्यान प्रवाश करणाºया प्रवाशांना जनरलच्या तिकिटवर स्लिपर कोचमधुन प्रवासा करता येईल ही सुविधा गरीब व पासधारक प्रवाशांसाठी पुढील आठवड्यापासून सुरु करण्यात येईल, असे आश्वासन डिआरएम गुप्ता यांनी शिशुपाल पटले यांना दिले.
नविन डब्ब्यांमुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील दुध उत्पादकांना हे सोयीचे माध्यम ठरणार आहे. त्यामुळे त्यांना सुविधा निर्माण होत असल्याने परिसरातून नागपूर किंवा नागपूर येथून गोंदियाकडे प्रवास करणारे रेल्वे प्रवासी समाधान व्यक्त करीत आहेत.