धान उत्पादक शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे नवे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:35 AM2021-02-10T04:35:42+5:302021-02-10T04:35:42+5:30

वाढत्या खर्चामुळे धानाची शेती तोट्याची होऊ नये, नव्या तंत्राने किडीची ओळख व्हावी, वेळेत उपाययोजना व्हाव्यात, त्या कशा करायच्या, याबाबत ...

New technology lessons for paddy growers | धान उत्पादक शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे नवे धडे

धान उत्पादक शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे नवे धडे

Next

वाढत्या खर्चामुळे धानाची शेती तोट्याची होऊ नये, नव्या तंत्राने किडीची ओळख व्हावी, वेळेत उपाययोजना व्हाव्यात, त्या कशा करायच्या, याबाबत सविस्तर मार्गदर्शनाचे नियोजन करीत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शन कार्यक्रमाला चुलबंद खोऱ्यातील शेकडो शेतकरी बांधव हजर होते. मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ एफएमसीचे कृषितज्ञ स्वप्निल जठार, हिरामण मंडल, कर्तव्य कुंमार लांडगे, शेतकरी वर्गातून गावचे सरपंच रवींद्र खंडाळकर, विजय खंडाळकर, गोकुळ राऊत, बळीराम बागडेे आदी शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. यात नर्सरी अर्थात पऱ्हे घालण्यापासूनचे इत्थंभूत मार्गदर्शन करण्यात आले.

शासनाचे धोरण व स्थानिक ठिकाणी बाजाराचा अभ्यास घेत, नेमके कोणते वाण लावायचे, याबाबत माहिती पुरविण्यात आली. शक्यतो धान हे उष्णकटिबंधीय पीक असल्याने मार्चपर्यंत रोवणी होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. थंडीमध्ये अपेक्षित पिकाची वाढ होत नाही. त्यामुळे खर्चात वाढ करावी लागते. खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामाला काळजी अधिक घ्यावी लागते. उन्हाळी धानाला खोडकिडीचा त्रास अधिक असतो. खोडकिडीच्या नियंत्रणाकरिता नर्सरीपासून ते रोवनीपर्यंत व रोवणीनंतर टप्प्याटप्प्याने जमिनीतून व फवारणीतून कीडनाशकाची मात्रा देण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी शेतकरी वर्गांनी आपल्या शंकांचे निराकरण करीत अधिकाऱ्यांचे कृषी तंत्रज्ञान सविस्तरपणे समजून घेतले.

खतांची मात्रा साध्या धानाकरिता व संकरित धानाकरिता किती व कशी वापरायची, याचेही मार्गदर्शन करण्यात आले. कितीच्या नियंत्रणाकरिता जमिनीतून पुरविण्यात येणाऱ्या कीडनाशकाचीही माहिती देत, फर्टेरा हे अत्यंत उपयुक्त कीटकनाशक असल्याचे सांगण्यात आले. वारंवार एकाच जागेत धान पीक घेण्यापेक्षा पिकाची आलटून पालटून जागा बदलावी. एकाच जागेत एकच पीक नियमित लावू नये. दरवर्षाला शक्यतो शेणखत वापरण्याचा प्रयत्न करावा. बियाण्यांची प्रक्रिया करूनच गादी वाफ्यावर पेरणी करावी. असे कित्येक घरगुती उपाय आतील शून्य खर्चातील बरेच उपाय मार्गदर्शनात कृषितज्ज्ञांनी सांगितले. कार्यक्रमाकरिता राकेश नौकरकर, आनंद भाकुळे, आशिक नैताम, प्रशांत जांभुळकर, शरद निखाडे, गजानन हटवार, पवन हुमे आदींनी सहकार्य केले.

Web Title: New technology lessons for paddy growers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.