महाराष्ट्रात पुढील सरकार राकाँ-काँग्रेसची येणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 12:50 AM2019-08-19T00:50:00+5:302019-08-19T00:50:22+5:30
मागील पाच वर्षात भाजप - सेनेच्या सरकारने काहीच कामे केली नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेत जनतेला काहीच लाभ झाला नसून लोकसभा निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर काहीच परिणाम होणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : मागील पाच वर्षात भाजप - सेनेच्या सरकारने काहीच कामे केली नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेत जनतेला काहीच लाभ झाला नसून लोकसभा निवडणुकीचा विधानसभा निवडणुकीवर काहीच परिणाम होणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात पुढील सरकार हमखास राकाँ - काँग्रेसची येईल, असा दावा राकाँचे वरिष्ठ नेते तथा राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी तुमसरात आयोजित पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला.
गभणे सभागृहात आयोजित राकाँ पक्ष कार्यकर्त्यांच्या सभेला मंचावर माजी खासदार मधुकर कुकडे, माजी आ.अनिल बावनकर, राकाँचे प्रदेश महासचिव धनंजय दलाल, माजी आमदार राजेंद्र जैन, प्रदेश सचिव तथा तथा माजी नगराध्यक्ष अभिषेक कारेमोरे, जिल्हा परिषद सभापती रेखा ठाकरे, राजू कारेमोरे, वासुदेव बांते, ठाकचंद मुंगुसमारे, राजू माटे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी आष्टी येथील भाजप कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांचे स्वागत खा.प्रफुल्ल पटेल यांनी केले. प्रास्ताविक राकाँचे तुमसर-मोहाडी विधानसभा प्रमुख विठ्ठलराव कहालकर, तालुका अध्यक्ष देवचंद ठाकरे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन माजी नगराध्यक्ष विजयकुमार डेकाटे तर आभार शहर राकाँ अध्यक्ष योगेश सिंगनजुडे यांनी मानले.
सभेला नगरसेवक सलाम तुरक, राजेश देशमुख, सुनील थोटे, किरण अतकरी, विजय पारधी, सुरेश राहांगडाले, बबलू कटरे, मनोज वासनिक, दिलीप सोनवाने, रामदास बडवाईक, शैलेश साखरवाडे, प्रा.संजय बुराडे सह राकाँ पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.