केरोसिनअभावी गरिबांची रात्र अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:43 AM2021-07-07T04:43:55+5:302021-07-07T04:43:55+5:30
ग्रामीण भागात पावसाळ्यात सगळीकडेच चिखल व दुर्गंधीचे वातावरण पहावयास मिळते. गावालगतच शेती असल्याने गावात घरोघरी विविध कीटकांचा वावर दिसून ...
ग्रामीण भागात पावसाळ्यात सगळीकडेच चिखल व दुर्गंधीचे वातावरण पहावयास मिळते. गावालगतच शेती असल्याने गावात घरोघरी विविध कीटकांचा वावर दिसून येताे. पावसाळ्याच्या दिवसांत या परिसरात विजेचा लपंडाव सुरू असल्याने तर दुसरीकडे केरोसिनचा पुरवठा होत नसल्याने रात्रीच्या दरम्यान अंधारात कीटकांची भीती वाढली आहे.
शासनाद्वारे केरोसिन उपलब्ध करण्यात येत नसल्याने व सोबतच पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने वाहनांच्या दुरुस्ती कामांत नियमित रुपात पेट्रोल-डिझेलचा वापर महागात पडत आहे. त्यामुळे केरोसिनच्या अभावाने मोटार मेकॅनिक देखील त्रस्त आहेत.
बॉक्स
दर महिन्याला केरोसिनचा पुरवठा करा
ग्रामीण भागात रात्रीच्या दरम्यान वीजपुरवठा बंद होत असल्याने सर्व कुटुंबांना केरोसिनच्याअभावी अंधारात रहावे लागत आहे. पावसाळ्यात ग्रामीच्या भागात रात्रीच्या सुमारास विविध कीटकांमुळे जीवितहानी होण्याची शक्यता असते. अशा स्थितीत ग्रामीण भागातील रेशन दुकानांद्वारे प्रतिमहिना एक लीटर केरोसिनचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषदचे माजी सदस्य मनोहर राऊत यांनी केली आहे.