खराशी शाळेत मुलांनी घेतला रात्र शाळेचा आनंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2018 09:33 PM2018-10-07T21:33:38+5:302018-10-07T21:34:00+5:30
सहशालेय उपक्रमा अंतर्गत नानाविध उपक्रमांची रेलचेल असलेली महाराष्ट्रात प्रसिद्ध जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी येथे शुक्रवाराला रात्री शाळेचे आयोजन करण्यात आले .
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : सहशालेय उपक्रमा अंतर्गत नानाविध उपक्रमांची रेलचेल असलेली महाराष्ट्रात प्रसिद्ध जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल खराशी येथे शुक्रवाराला रात्री शाळेचे आयोजन करण्यात आले . पोलीस विभाग भंडारा, पालांदूर पोलीस ठाणे तर्फे विद्यार्थ्यांना जेवणाची निवासाची सोय करण्यात आली. या कार्यात पालांदूरचे ठाणेदार अंबादास सूनगार व त्यांचे पोलीस कर्मचारी मंडळींनी पूर्ण सहभाग दिला. सामाजिक बांधीलकी या नात्याने बालगोपाल मंडळींच्या चेहऱ्याावर हास्य फुलविले.
रात्र शाळेत शाळेच्या इयत्ता पहिली ते चवथी पर्यंतच्या सर्व १४६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. रात्र शाळेत अनेक सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केले, 'सब खेलो सब जितो' यात भाग घेऊन सामान्य ज्ञानाने उपस्थितांना आश्चर्य चकित केले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष थालीराम बावने यांनी आपल्या चमूसह कलापथक सादर करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले, विज्ञानाचे प्रयोग दाखवले गेले. यात सर्व पालकांनी सहभाग घेतला. रात्री शाळेतच निवास करून सकाळी विद्यार्थ्यांनी योगा प्रशिक्षण घेतला. सकाळच्या नाश्त्याची व्यवस्था दिघोरी येथील पालकांनी केले.
सदर उपक्रमांसाठी मुख्याध्यापक मुबारक सैय्यद यांच्या नेतृत्वात सतीश चिंधालोरे, योगीराज देशपांडे, शुभांगी लुटे, तारा कांबळे , दिगांबर फुंडे या सहायक शिक्षकांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाच्या मदतीसाठी शाळेचे माजी शिक्षक राम चाचेरे यांनी रात्र शाळेला उपस्थिती दर्शवून उपक्रमाचे कौतुक केले.