निलज बु. येथे नियमित तलाठी नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:26 AM2021-06-01T04:26:43+5:302021-06-01T04:26:43+5:30
राज शासनाने मागच्या वर्षी निलज बु. तलाठी सजा मंजूर केला आहे. मात्र, देव्हाडा बु. येथे असलेल्या तलाठ्यावरच निलज बु. ...
राज शासनाने मागच्या वर्षी निलज बु. तलाठी सजा मंजूर केला आहे. मात्र, देव्हाडा बु. येथे असलेल्या तलाठ्यावरच निलज बु. या सजाची भिस्त आहे. त्यामुळे येथील तलाठी यांची तीन सजांची कामे करताना फरपट होत आहे. मागील काही दिवसांपूर्वी देव्हाडी येथील तलाठी वैद्यकीय रजेवर गेल्याने येथील प्रभार मोहगाव येथील तलाठ्यांना देण्यात आला आहे. त्यांच्याकडे आधीचाच कामाचा बोजा असल्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे. सद्या शासनाने रब्बी धान पिकासाठी सातबारा उताऱ्यावर नोंदणीची वेळ या महिन्याच्या शेवटीपर्यंत दिली आहे. परंतु, एवढ्या गोंधळात शासनाने तलाठी व शेतकऱ्यांना दिलेला वेळ पुरेसा ठरेल का हे महिन्याअखेरपर्यंतच्या चित्रावरूनच कळेल. निलज बु. सजा क्रमांक ३६ वर लवकरात लवकर तलाठ्याची नियुक्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे.
देव्हाडा येथील तलाठ्याकडे देव्हाडा बु., नरसिंह टोला, देव्हाडा खुर्द (एलोरा), निलज बु., निलज खुर्द, मुंढरी खुर्द ही गावे आहेत.