नीलगाईला जीवनदान

By admin | Published: November 24, 2015 12:37 AM2015-11-24T00:37:16+5:302015-11-24T00:37:16+5:30

गावातील मोकाट कुत्री पाठीमागे लागल्याने सैरावैरा पळत सुटलेली नीलगाय गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालवात पडली.

Nilgai Life Life | नीलगाईला जीवनदान

नीलगाईला जीवनदान

Next

मैत्र संस्थेचा पुढाकार : गोसे धरणातून काढले बाहेर
पवनी : गावातील मोकाट कुत्री पाठीमागे लागल्याने सैरावैरा पळत सुटलेली नीलगाय गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालवात पडली. याची माहिती मिळताच मैत्र वन्यजीव संरक्षण व संवर्धन बहुउद्देशिय संस्था पवनीचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी निलगायीला मोकाट कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून व पाण्यातुन बाहेर काढून तिला जीवनदान दिले. ही घटना सोमवारी सकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली.
गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालवात साखळी क्र ११/६०० मध्ये निलगाय पडल्याची माहिती मैत्रचे सचिव माधव वैद्य यांना मिळाली. त्यांनी संस्थेच्या अन्य पदाधिकाऱ्यांना व वन अधिकाऱ्यांना यांची माहिती देवून संस्थेचे अध्यक्ष खेमराज पचारे, उपाध्यक्ष महादेव शिवरकर, महेश मठीया, संघरत्न धारगांवे, अमोल वाघधरे व वनविभागाच्या चमूसह सर्वजण घटनास्थळी दाखल झाले.
निलगायीचा पाठलाग करणाऱ्या मोकाट कुत्र्यांना हुसकावून लावित कालव्यातून सैरावैरा पळत असलेल्या निलगायीला त्यांनी पकडले. तेव्हा निलगाय जखमी असल्याचे त्यांना आढळून आले. निलगायीच्या कानाला कुत्र्यांनी चावा घेतल्याने व नहरातून सैरावेरा पळाल्यामुळे तिचे चारही पायाच्या खुरा रक्तबंबाळ झाल्या होत्या.
जखमी अवस्थेतील निलगायीला मैत्रच्या पदाधिकारी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी नहराचे बाहेर काढले. यावेळी जखमी अवस्थेतील निलगायीवर घटनास्थळीच मैत्रच्या पदाधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार केले. निलगायीवर प्राथमिक उपचार करुन तिला उपस्थित वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या सुपुर्द केले. यानंतर वनविभागाने निलगायीवर तज्ज्ञ डॉक्टरांकडून औषधोपचार केले. यावेळी संस्थेचे अध्यक्ष खेमराज पचारे, उपाध्यक्ष महादेव शिवरकर, सचिव माधव वैद्य, महेश मठीया, संघरत्न धारगांवे, वनविभागाचे बिटरक्षक ए.व्ही.खेनते, आर.बी.घुगे, आर.डी.पांढरे, तसेच वनमजूर आर.एम.कुर्झेकर, आर.के.रामटेके, के.डी.शेंडे, विपीन तलमले, बादल शेंडे, पंकज तलमले यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व वनकर्मचारी उपस्थित होते. संस्थेचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Nilgai Life Life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.