दारू सह नऊ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 10:44 PM2018-03-03T22:44:53+5:302018-03-03T22:44:53+5:30
होळीच्या पर्वावर दारूची तस्करी करणाºया वाहनाला पकडून ९ लाख २ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आॅनलाईन लोकमत
भंडारा : होळीच्या पर्वावर दारूची तस्करी करणाऱ्या वाहनाला पकडून ९ लाख २ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने केली. या प्रकरणातील आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
स्कॉर्पिओ (एम.एच. ३६ - एच. २३९०) या वाहनाला पथकाने थांबविण्याचा प्रयत्न केला असता वाहनचालकाने धूम ठोकली. त्यामुळे या वाहनाचा पाठलाग करून वाहन थांबविले असता वाहन सोडून चालक फरार झाला. वाहनाची झाडाझडती घेतली असता ७० पेट्यात देशी दारूच्या ७ हजार सिलबंद बाटल्या व वाहन असा ९ लाख २ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पवनी तालुक्याला दारूबंदी चंद्रपूर जिल्ह्याची सीमा लागून आहे. त्यामुळे देशी दारूचा हा साठा चंद्रपूर जिल्ह्यात नेण्यात येत असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.