नऊ लाखांची अफरातफर !

By admin | Published: September 21, 2015 12:21 AM2015-09-21T00:21:50+5:302015-09-21T00:21:50+5:30

वनविभागातील योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनेच्या निधीत ९ लक्ष २९ हजार ७३३ रुपयांची अफरातफर केल्याचा प्रकार...

Nine lakhs of fraud! | नऊ लाखांची अफरातफर !

नऊ लाखांची अफरातफर !

Next

साकोली : वनविभागातील योजनेंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनेच्या निधीत ९ लक्ष २९ हजार ७३३ रुपयांची अफरातफर केल्याचा प्रकार नागझीरा वाघ्र राखीव क्षेत्रांतर्गत उघडकीला आला आहे. याप्रकरणी वनाधिकारी अशोक श्रीराम खुणे यांच्या तक्रारीवरुन साकोली पोलिसांनी ग्राम परिसर विकास समितीचे अध्यक्ष अशोक पर्वते व सचिव एम. जे. पारधी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. शासनाकडून पुरविण्यात आलेल्या ३०० कुटूंबीयाना दुधाळू जनावरे, जलसंवर्धनाच्या कामाकरिता शासकीय निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. ती रक्कम स्वत:चा खर्चात उपयोगात आणण्यात आली. रोकडवहीप्रमाणे आठ लक्ष एक हजार ९८९ रुपयांपैकी ४,३५६ रुपये शिल्लक ठेवून उर्वरित रक्कम वटविण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक सुरेश धुसर करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Nine lakhs of fraud!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.