दहापैकी नऊ जणांना बायकोचाही मोबाईल नंबर पाठ नाही....!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:24 AM2021-07-10T04:24:54+5:302021-07-10T04:24:54+5:30
भंडारा : काळ बदलला. काळासोबत विविध उपकरणेही बदलली. याचा रिॲलिटी चेक ‘लोकमत’ने केला. त्यासाठी काही चौक आणि काही ...
भंडारा : काळ बदलला. काळासोबत विविध उपकरणेही बदलली. याचा रिॲलिटी चेक ‘लोकमत’ने केला. त्यासाठी काही चौक आणि काही व्यक्तींशी संपर्क साधला तर अनेकांना आपल्या पत्नीचा नंबरही पाठ नसल्याचे लक्षात आले. विशेष म्हणजे त्यांच्या मुलांना आपल्या आई-वडिलांचा नंबर पाठ आहे.
मानसोपचारतज्ज्ञांनी याविषयात आपले मत मांडताना नागरिक आपल्या रिकॉल मेमरीचा वापर करीत नाहीत. त्यामुळे असा प्रकार घडतो, असे ते म्हणाले. अद्ययावत तंत्रज्ञानाने माणूस हायटेक तर झाला. परंतु तो परावलंबी झाला. त्याचा मोबाईल बंद पडला तर त्याचे सर्व काम थांबून जाते. यासाठी प्रत्येकाने दररोज रिकॉल मेमरीचा वापर केला पाहिजे. अन्यथा मेमरी असतानाही त्याचा उपयोग होणार नाही.
बॉक्स
तरुणांपासून वृद्धांपर्यंत सारे सारखेच
मोबाईल आल्यापासून तरुणापासून वृद्धापर्यंत सर्वजण नंबरच्या बाबतीत परावलंबी झाले आहेत.
पूर्वी मोबाईल नव्हता त्यावेळेस प्रत्येकाला कुटुंबातील सदस्यांसह काही व्यक्तींचे नंबर तोंडपाठ असायचे.
आता नाव आठवल्यानंतर मोबाईलच्या मेमरी बॉक्समध्ये जाऊन नंबर काढले जातात. यातून रिकॉल मेमरी कमी होत आहे. यामुळे अनेकांना पाठ राहणारे नंबर मोबाईल पाहिल्याशिवाय सापडत नाही.
कोट
पोरांना आठवते, मोठ्यांना का नाही?
लहान मुलांना अपण वारंवार सांगून नंबर पाठ करून घेतो. यामुळे शॉट मेमरी लाँग टर्म मेमरीमध्ये परिवर्तन होऊन नंबर लक्षात राहतो. मोबाईलमुळे मोठे व्यक्ती परावलंबी होऊन शॉर्ट मेमरीचा वापर करीत नाही.
- डॉ. सुहास गजभिये,
मानसोपचारतज्ज्ञ, भंडारा.