निर्मलग्राम योजना केवळ कागदावरच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 10:30 PM2018-05-07T22:30:40+5:302018-05-07T22:30:40+5:30
शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्या सुरक्षित रहावे याकरिता अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. अशीच निर्मलग्राम योजना राबविली जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बारव्हा : शासनाने ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्या सुरक्षित रहावे याकरिता अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. अशीच निर्मलग्राम योजना राबविली जात आहे. मात्र ही योजना सध्या कागदावरच दिसून येत आहे. अनेक गावात अद्यापही घाणच घाण पसरलेले असून याकडे मात्र जबाबदार अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.
राज्य शासनाने दरवर्षी स्वच्छता अभियान राबविले जाते. त्यामध्ये सर्वाेत्कृष्ट कार्य करणाऱ्या गावांना पुरस्कार प्रदान केला जात आहे. या योजनाची गावात सक्षम आणि काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही प्रशासनाची आहे. मात्र प्रशासनातील अधिकाºयांच्या उदासीन धोरणामुळे या निर्मलग्राम योजनेला खिळ बसली आहे.
लाखांदूर तालुक्यातील बारव्हा, जैतपूर, तावशी, चिकणा, चिचाळ, कोदामेडी अशा अनेक गावात या योजनेचा पुरता बोजवारा उडाला आहे. अनेक नाल्यांमध्ये साचलेल्या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक ठिकाणी कचºयांचे ढिगारे तर काही ठिकाणी मुख्य रस्त्यावर शेतखताचे खातकुडे तयार केल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असते. मात्र अद्यापही जबाबदार अधिकाºयांनी याकडे लक्ष घातलेले नाही. याबाबत नागरिकांकडून संताप व्याप्त आहे.