रोजगार नाही तर सरकार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:38 AM2021-05-20T04:38:28+5:302021-05-20T04:38:28+5:30

एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार दरवर्षी ३८ बेरोजगार आत्महत्या करतात. या बेरोजगारी विषयी कोणताही पक्ष, कोणताही नेता ,कोणतीही संघटना आवाज उठवत नाही. ...

No employment, no government | रोजगार नाही तर सरकार नाही

रोजगार नाही तर सरकार नाही

googlenewsNext

एनसीआरबीच्या रिपोर्टनुसार दरवर्षी ३८ बेरोजगार आत्महत्या करतात. या बेरोजगारी विषयी कोणताही पक्ष, कोणताही नेता ,कोणतीही संघटना आवाज उठवत नाही. परंतु भारतीय विद्यार्थी मोर्चाने या विषयाची गंभीरता लक्षात घेऊन वाढती बेरोजगारी व सरकारच्या विरोधामध्ये काळी पट्टी निषेध आंदोलनाचे आयोजन केले केले होते.

ज्या नोकर भरतीवर सरकारने बंदी घातलेली आहे, ती ताबडतोब हटविण्यात यावी. लवकरात लवकर राहिलेली भरती केली पाहिजे. जोपर्यंत सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी मिळत नाही तोपर्यंत त्यांना बेरोजगारी भत्ता दिला पाहिजे, खाजगीकरण बंद करून सरकारी पर्मनंट नोकरी कायमची सुरू केली पाहिजे, सुशिक्षित बेरोजगारांची वयाची अट नोकरी लागताना संपण्याआधी त्यांना नोकरी उपलब्ध करून दिली पाहिजे, सर्व प्रकारच्या भरतीमध्ये महिलांना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात नोकरी उपलब्ध करून दिली पाहिजे अशा विविध प्रकारच्या मागण्या सरकारकडे केल्या आहेत. सरकारला जागे करण्यासाठी या आंदोलनाचा दुसरा टप्पा प्रतीकात्मक ईव्हीएम मशीन जलाओ आंदोलन १२ मे रोजी केले आहे. शेवटचा टप्पा विद्यार्थ्यांची मिळालेली डिग्री प्रतीकात्मक जलाव आंदोलन सोमवार रोजी करण्यात आले.

यावेळी सिद्धार्थ घोडीचोर, मोनू तुरकणे, नीतेश तुमसरे, परवेझ शेख, धर्मेश मेश्राम, शंतनू बोंबार्डे, सौरभ मेश्राम, ऋषी गोंडाणे, रोहन मेश्राम, मुकेश मेश्राम आदी उपस्थित होते.

Web Title: No employment, no government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.