जिल्हा बँकेत नोटांना ‘नो एण्ट्री’

By Admin | Published: November 12, 2016 12:32 AM2016-11-12T00:32:26+5:302016-11-12T00:32:26+5:30

दोन दिवसांपुर्वी ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यामुळे सरकारने सर्वच बॅकांना जुन्या नोटा घेण्याचे आदेश देण्यात आले.

No Entry in Notes to District Bank | जिल्हा बँकेत नोटांना ‘नो एण्ट्री’

जिल्हा बँकेत नोटांना ‘नो एण्ट्री’

googlenewsNext

दुसऱ्या दिवशीही रांगा : भंडाऱ्यात दोन हजारांची नोट दाखल, पाचशेच्या नोटेची उत्सुकता
भंडारा : दोन दिवसांपुर्वी ५०० व १००० रूपयांच्या नोटा चलनातून रद्द झाल्या. त्यामुळे सरकारने सर्वच बॅकांना जुन्या नोटा घेण्याचे आदेश देण्यात आले. मात्र भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने या नोटा घेण्यासाठी नकार दिला. बँकेत संचालक मंडळ असते तर असा प्रकार घडला नसता, असे ग्राहकांचे म्हणने होते. प्रशासक मंडळांमुळे ग्राहकांना समाधानकारक उत्तरे मिळू शकली नाही.
शुक्रवारला सकाळच्या सत्रात जिल्हा बँक उघडताच ग्राहकांनी आणलेल्या ५०० व १००० रूपयांच्या नोटा स्वीकारण्यासाठी बँकेने नकार दिला. परिणामी ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आल्यापावली परतावे लागले. सहकार क्षेत्रात शेतकऱ्यांची जिव्हाळ्याची बँक असलेल्या जिल्हा बँकेत सर्वाधिक खाते शेतकऱ्यांचे आहेत. चलनातून ५०० व १००० रूपयांच्या नोटा रद्द होताच ग्राहकांनी या बँकेतही नोटा बदलविण्यासाठी गर्दी केली. मात्र ग्राहकांच्या निराशा आली. दरम्यान, बँक कर्मचारी व ग्राहकांमध्ये हुज्जतबाजी झाली.
मासळ शाखेमध्ये ५०० व १००० रूपयांचा व्यवहार बंद ठेवण्यात आल्यामुळे ग्राहकांना पैशाची अदलाबदल करता न आल्यामुळे ग्राहकांमध्ये कमालिचा असंतोष पसरला होता. (प्रतिनिधी)

दोन दिवस ‘टोल फ्री’चा
भंडारा जिल्ह्यातून मार्गाक्रमण होणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दोन टोल नाके आहेत. यापैकी कारधा येथे तर दुसरे साकोली-सौंदड मार्गावर आहे. पंतप्रधानांच्या ५०० व १००० रुपयांच्या ‘नोटा’ रद्दच्या घोषणेनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात दोन दिवसपर्यंत नागरिकांसाठी पथकर नाका ‘टोल फ्री’ करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार ९ नोव्हेंबरच्या सायंकाळी ६ वाजतापासून नाक्यावर टोल आकारण्यात आला नाही. १० व ११ नोव्हेंबरला दोन दिवस टोल नाके बंद असले तरी त्याची भरपाई शासन करून देणार आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावर १४ नोव्हेंबरपर्यंत टोल माफ करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे. दोन दिवसाच्या टोल बंदीमुळे लक्षावधी रूपयांची उलाढाल थांबली. १५ नोव्हेंबरपासून पुन्हा टोल आकारला जाणार आहे.

शहरातील अर्धेअधिक एटीएम बंदच
भंडारा शहरात सर्वच राष्ट्रीयकृत बँका व सहकारी क्षेत्रातील बँकांचे शंभरावर एटीएम आहेत. मात्र यापैकी अर्धेधिक एटीएम आज तिसऱ्या दिवशीही बंदच होते. परीणामी ‘रोख’ काढण्यासाठी नागरिकांची धावपळ झाली. शहरात सर्वाधिक एटीएम सेंटर हे स्टेट बँक, बँक आॅफ इंडिया, अ‍ॅक्सिस बँक, आयसीआसीआय, युनियन बँक, महाराष्ट्र बँक, जिल्हा बँक यासह अन्य बँकाचे एटीएम आहेत. यापैकी बहुतांश एटीएम तिसऱ्या दिवशीही बंद होते. जे एटीएम सुरू होते त्यातून केवळ एकावेळी ग्राहकाला दोन हजार रूपयांचे विड्राल करता येत होते.

Web Title: No Entry in Notes to District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.