आता पासशिवाय घराबाहेर पडता येणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 06:00 AM2020-03-28T06:00:00+5:302020-03-28T06:00:42+5:30
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीसह कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कुणीही घराबाहेर निघू नये, असे प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र रस्त्यांवरील गर्दी कमी होताना दिसत नाही. महत्वाच्या कामासाठी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर निघण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु अनेक जण कोणतेही कारण नसताना रस्त्यावर फिरताना दिसत होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : लॉकडाऊनच्या काळात प्रशासनाने वारंवार सूचना देवूनही नागरिक नाहक रस्त्यांवर येवून पोलिसांचा ताण वाढवत आहे. गर्दीमुळे कोरोना संसर्गाची अधिक भीती असते. नागरिकांची रस्त्यांवरील गर्दी टाळण्यासाठी भंडारा नगरपरिषद प्रत्येक कुटुंबाला पास देणार आहे. निर्धारित दिनांकालाच कुटुंबातील एकाच व्यक्तीला महत्वाच्या कामासाठी घराबाहेर पडता येणार आहे. नगरपरिषद येत्या दोन दिवसात शहरातील प्रत्येक कुटुंबाला ही पास घरपोच देणार आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदीसह कलम १४४ लागू करण्यात आले आहे. कुणीही घराबाहेर निघू नये, असे प्रशासनाच्या वतीने वारंवार आवाहन केले जात आहे. मात्र रस्त्यांवरील गर्दी कमी होताना दिसत नाही. महत्वाच्या कामासाठी आणि जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी घराबाहेर निघण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु अनेक जण कोणतेही कारण नसताना रस्त्यावर फिरताना दिसत होते. पोलिसांनी विचारल्यास कुणी किराणाचे, कुणी औषधीचे तर कुणी भाजीपाल्याचे कारण सांगत होते. हातात पिशवी घेवून दुचाकीवर रपेट मारणाऱ्या टार्गट तरूणांची संख्याही वाढली होती. पोलिसांनी आपल्या खाक्या दाखवूनही कोणी वढणीवर येत नव्हते. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी नगरपरिषदेला निर्देश देवून ओळखपत्र वितरणाची सूचना दिली.
आता भंडारा शहरात घराबाहेर निघण्यासाठी नगरपरिषदेने दिलेली अधिकृत पासच आवश्यक राहणार आहे. सदर पास प्रत्येक कुटुंबाला नगरपरिषदेचे कर्मचारी घरपोच पोहचून देणार आहे. शहरात २५ हजार मालमत्ताधारक असून त्या प्रत्येकाला ती पास दिली जाईल. यासाठी पासेस नगरपरिषदेचे तयार केल्या असून ३० कर्मचारी दोन दिवसात या पासचे प्रत्येकाकडे वितरण करणार आहे. ही पास घेवूनच बाहेर निघता येणार आहे. या पासवर एक दिवसाआढ घराबाहेर निघण्याची राहणार आहे. घरून निघताना बाहेर निघण्याचे कारण त्यावर नमूद करावे लागेल. तसेच दुकानदाराची स्वाक्षरीही या पासवर घ्यावी लागेल. विशेष म्हणजे या पासवर ज्याचे नाव असेल त्याचा फोटो राहणार आहे. तोच व्यक्ती घराच्या बाहेर निघेल. बाहेर तपासणी करताना संबंधिताना त्याला आपले इतर ओळखपत्रही दाखवावे लागणार आहे. शुक्रवारी या पासचे वितरण शहरातील काही भागात नगरपरिषदेचे अभियंता नागेश कपाटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले. येत्या दोन दिवसात सर्वांना ही पास वितरित करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
्रपास देताना महिलांच्या नावांना प्राधान्य
जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर निघताना आता पास सक्तीची करण्यात आली आहे. नगरपरिषद पास वितरीत करताना कुटुंबातील महिलेच्या नावाला प्राधान्य देणार आहे. सदर पासवर पासधारकाचे नाव, कुटुंबातील व्यक्तीची संख्या, पत्ता, छायाचित्र असून त्यावरच एक दिवसा आढची तारीख मुद्रीत करण्यात आलेली आहे. एका कुटुंबाला २८ मार्च रोजी बाहेर जाण्याची परवानगी असेल तर त्याला दुसºया दिवशी घराबाहेर निघता येणार नाही. तर एक दिवस आढ म्हणजे ३० तारेखला घराबाहेर केवळ खरेदीसाठीच निघता येणार आहे. तारखेप्रमाणे बाहेर येणाºयावर कारवाई करणार आहे.
सहा ठिकाणी भरणार भाजी बाजार
भंडारा शहरात वरठी रोडवरील टाकळी येथील आयटीआयसमोर, शास्त्री चौकातील दसरा मैदान, खात रोडवरील रेल्वे ग्राऊंड, गांधी चौकात छोटा बाजार, पोस्ट ऑफिस चौकात बडा बाजार, राजीव गांधी चौकात गणेश विद्यालय आणि मुस्लिम लायब्ररी चौकात तुरस्कर गार्डनमध्ये भाजीपाला बाजार भरविला जाणार आहे. सामाजिक अंतर ठेवून हा बाजार भरविला जाणार असून नगरपरिषदेचे आखून दिलेल्या ठिकाणीच विक्रेत्यांना आपल्या साहित्याची विक्री करावी लागणार आहे. नागरिकांनी आपल्या परिसराच्या जवळील बाजारातूनच खरेदी करावी, असे आवाहन केले आहे.