शाळा सुरू करायला हरकत नसावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:24 AM2021-06-17T04:24:39+5:302021-06-17T04:24:39+5:30

गत पंधरा महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शैक्षणिक नुकसान समाजाच्या व विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. नैसर्गिक व सामाजिक समस्यांना ...

No problem to start school! | शाळा सुरू करायला हरकत नसावी!

शाळा सुरू करायला हरकत नसावी!

googlenewsNext

गत पंधरा महिन्यांपासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शैक्षणिक नुकसान समाजाच्या व विद्यार्थ्यांच्या हिताचे नाही. नैसर्गिक व सामाजिक समस्यांना तोंड देत आयुष्य पुढे रेटायचे आहे. संकट आहे म्हणून वेळ न टाळता संकटाशी सामना करण्याकरिता सज्ज राहायचे आहे. शैक्षणिक क्षेत्राकरिता असेच धोरण राबविण्याची मानसिकता तयार झालेली आहे. कोरोना गेला नसला तरी, वेळीच काळजी घेत, कामे वेळच्या वेळी करावी लागणार आहेत.

बॉक्स

विद्यार्थ्यांची शिक्षणाची लय तुटली!

कोरोनाच्या संकटकाळाने शाळा बंद पडल्या. पर्यायाने घरातच राहून विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु ऑनलाइन शिक्षण हे केवळ नाममात्र शिक्षण ठरले. ऑनलाइन शिक्षणाच्या नादात कित्येक मुलं मोबाईलवर इतर अनावश्यक, असामाजिक बाबींकडे वळली गेली. प्रत्यक्ष पुस्तक, शैक्षणिक वातावरण, चर्चासत्र, प्रश्न-उत्तरे यांची उणीव असल्याने विद्यार्थ्यांची शिक्षणाची लय तुटलेली जाणवत आहे.

कोट

आरोग्य विभागाच्या सूचनेनुसार शिक्षण विभागाने तत्परता बाळगत वेळेचे महत्त्व जपत शैक्षणिक क्षेत्र सुरू करायला हरकत नाही. केवळ कोणाच्या भीतीने शिक्षण थांबवणे योग्य वाटत नाही. तिसऱ्या लाटेचा विचार डोक्यात आणून उद्याकरिता आजचा दिवस वाया घालवणे योग्य नाही. तेव्हा कोणाची भीती न बाळगता काळजी घेत शाळा सुरू करावी.

- संजय काटेखाये, पालक, पालांदूर.

कोट

शाळा नसल्याने मुलं उनाड बनली आहेत. पुस्तक विसरली असून, मोबाईल, टीव्ही यातच गुंतलेली आहेत. शिक्षणाविषयीची गोडी कमी झाली असून त्यांच्या भविष्याची चिंता वाढलेली आहे. त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शाळा सुरू होणे नितांत गरजेचे आहे.

- प्रमोद हटवार, पालक, पालांदूर

Web Title: No problem to start school!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.