पथदिव्यांची वीज नाही, मग लसीकरण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:41 AM2021-09-04T04:41:59+5:302021-09-04T04:41:59+5:30

महावितरणने तालुक्यातील गावांचा विद्युत पुरवठा खंडित केला, या पावसाळ्यात संपूर्ण गावागावांत अंधकारमय स्थिती असून सरपटणारे प्राणी, वन्य हिंसक प्राण्यांपासून ...

No streetlights, no vaccinations | पथदिव्यांची वीज नाही, मग लसीकरण नाही

पथदिव्यांची वीज नाही, मग लसीकरण नाही

Next

महावितरणने तालुक्यातील गावांचा विद्युत पुरवठा खंडित केला, या पावसाळ्यात संपूर्ण गावागावांत अंधकारमय स्थिती असून सरपटणारे प्राणी, वन्य हिंसक प्राण्यांपासून जीविताचा भयंकर धोका निर्माण झालेला आहे. गावात अनैतिक कृत्ये, चोरी, लूटमार, दरोडा यासारखे गुन्हेगारीला थारा मिळेल. दोन दिवसाआधी ऊर्जामंत्री व जिल्हाधिकारी यांना याबाबत निवेदनही दिले, पण काहीच तोडगा निघालेला नसून आता तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष पवनकुमार शेंडे यांच्या नेतृत्वात निवेदन दिले. गावात पथदिव्यांना जोपर्यंत वीज नाही तर लसीकरण नाही व शासनाच्या कोणत्याही कामात, योजनेत सहभाग घेणार नाही, असा आंदोलनात्मक पवित्रा घेतल्याने तालुक्यातील वातावरणात तापले आहे. जेवढे महत्त्व आरोग्यदृष्टीने लसीकरणाला आहे. तेवढेच महत्त्व पथदिवेही गरजेचे आहे. याने डास, कीटक, जंतू घरांघरात शिरून लहान बालकांसह जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. गावागावांतील पथदिव्यांचा वीज पुरवठा सुरू करावा, अशी साकोली तालुका सरपंच संघटनेची मागणी आहे. निवेदन देतेवेळी सरपंच संघटना उपाध्यक्ष नयना चांदेवार, शालिक खर्डेकर, सचिव प्रेमकुमार गहाणे, सर्व सरपंच मोहन लंजे, प्रल्हाद शेंदरे, विठ्ठल मसराम, संजय बडवाईक, हरिश्चंद्र दोनोडे, हरीश लांडगे, पुरुषोत्तम रुखमोडे, गायत्री टेंभुर्णे, माधुरी कटरे, खेमेश्वरी टेंभरे, सरिता राऊत, उशिका शेंडे, चंदा कांबळे, भीमावती पटले, कमला भेंडारकर, पुष्पा खोटेले, वनमाला सिंदीमेश्राम, अनुसया कोकोडे, पुस्तकला उईके, रविता मेंढे, रेखा कावळे, मंगला खोटेले, सुनीता हटवार, उषा डोंगरवार, पपिता कापगते, आशा लाडे यांसह अन्य सरपंच, उपसरपंच हजर होते.

Web Title: No streetlights, no vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.