यात्रा नाहीच ! भाविकांनी घेतले केवळ देवदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:04 AM2021-03-13T05:04:19+5:302021-03-13T05:04:19+5:30
बालाजी किल्ला समितीच्या वतीने महाशिवरात्री पर्व शांततेत अगदी साध्या पद्धतीने पार पाडण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी ...
बालाजी किल्ला समितीच्या वतीने महाशिवरात्री पर्व शांततेत अगदी साध्या पद्धतीने पार पाडण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावून देवदर्शन केले. २००७ पासून किटाडी येथे बालाजी किल्ला शिव मंदिरात महाशिवरात्रीला यात्रेचे आयोजन केले जाते. परिसरातील मांगली, मचारना, पालांदूर, तिरखुरी येथील भक्तगण मोठ्या प्रमाणात शिव मंदिरात हजेरी लावीत होते. यंदा शासन व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करीत या वर्षाला यात्रा न भरवण्याचे सुचविले होते. त्यामुळे केवळ पूजापाठ व देवदर्शनावरच बालाजी किल्ला येतील महाशिवरात्री निमित्त कार्यक्रम पार पडला. शिव मंदिरात भजन संध्या आयोजित करण्यात आली होते.
मंदिराचे पुजारी मोहन खोबरागडे, सुधाकर सयाम यांचे भरत खंडाईत यांनी सपत्नीक सन्मान करीत वस्त्रदान केले. यावेळी किटाडीचे उपसरपंच व बालाजी किल्ला समितीचे सचिव धनंजय घाटबांधे, लेखराम चौधरी, उद्धव मासुरकर, शरद निखाडे, शारदा निखाडे, रमेश हटवार, डॉक्टर आशिष गभने, भोजराम तलमले, रवींद्र खंडाईत, वैशाली खंडाईत, अर्जुन खंडाईत, भुमेश्वरी खंडाईत, श्यामा बेंदवार, सरपंच देवकन बेंदवार, मायाबाई तलमले, विनोद तलमले,मृणाली खंडाईत आदी भक्तगण उपस्थित होते. अत्यंत साध्या पद्धतीने पूजापाठात महाशिवरात्रीचे पर्व पार पडले.