एसटीतील राखीव जागांचा वापर नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:34 AM2021-03-20T04:34:55+5:302021-03-20T04:34:55+5:30
एसटी बसेसच्या सीटच्या मागे किंवा बाजूला आरक्षित सीट लिहिले असते. यामध्ये आमदार, दिव्यांग व्यक्ती, महिला, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार अशा ...
एसटी बसेसच्या सीटच्या मागे किंवा बाजूला आरक्षित सीट लिहिले असते. यामध्ये आमदार, दिव्यांग व्यक्ती, महिला, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार अशा प्रकारे राखीव सीट असतात. परंतु यांचा वापर होतच नाही. आमदार कधी बसने अभावानेच प्रवास करतात. परंतु , दुसऱ्या राखीव जागा महिला, अपंग, स्वातंत्र्य सैनिक या सीट राखीव असलेल्या जागी कुणीही व्यक्ती बसत असल्याचे पहावयास मिळते.
दक्षिणात्य क्षेत्रात असता तिथल्या बसेसमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर कुणी पुरूष बसत नाही याउलट आपल्या राज्यात महिलांकरिता राखीव सीटवर कुणी पुरूष बसला तर महिला काहीच बोलत नाही. यामुळे महिलांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. महिलांच्या राखीव सीटवर महिलाच बसायला हव्या. तर स्वातंत्र्य सैनिक, दिव्यांग, पत्रकार यांच्या सीट देखील वापर होणे गरजेचे आहे. याची जाणीव मात्र बऱ्याच व्यक्तींना अजूनपर्यंत नाही. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.