राष्ट्रवादीचे कुकडे यांचे नामांकन दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 12:41 AM2018-05-11T00:41:37+5:302018-05-11T00:41:37+5:30

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व पीरिपा आघाडीचे संयुक्त उमेदवार मधुकर कुकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरूवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडे सादर केला.

Nominations of Nationalist Congress Party | राष्ट्रवादीचे कुकडे यांचे नामांकन दाखल

राष्ट्रवादीचे कुकडे यांचे नामांकन दाखल

Next
ठळक मुद्देलोकसभा पोटनिवडणूक : भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील कार्यकर्ते मिरवणुकीत सहभागी

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व पीरिपा आघाडीचे संयुक्त उमेदवार मधुकर कुकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरूवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडे सादर केला.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, माजी खासदार नाना पटोले, गोंदियाचे आ.गोपालदास अग्रवाल, सावनेरचे आ.सुनिल केदार, आ.प्रकाश गजभिये, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, नाना पंचबुद्धे, माजी आमदार राजेंद्र जैन, अ‍ॅड.आनंदराव वंजारी, सेवक वाघाये, दिलीप बन्सोड, रमेश बंग, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, रिपाईचे वसंत हुमणे यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी व आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. सभेनंतर ट्रॅक्टर मिरवणुकीद्वारे कुकडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन नामांकनअर्ज दाखल केला.
तुम्ही शिफारस करा, आम्ही उमेदवारी देऊ
नामांकन दाखल करण्यापूर्वी आयोजित सभेत काँग्रेसच्या सर्वच नेत्यांनी प्रफुल्ल पटेल यांना उद्देशून आपण वर्षा पटेल यांची उमेदवारी कापली, याचा उल्लेख केला. हाच धागा पकडून प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात पुढच्या सार्वत्रिक निवडणुकीत आपण सर्वांनी मिळून वर्षा पटेल यांच्या नावाची शिफारस केली तर त्यांनाही उमेदवारी देता येईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सर्वांनी एकदिलाने काम करा - प्रफुल्ल पटेल
भविष्यात येणाऱ्या कुठल्याही निवडणुका आपण एकत्रितपणे लढण्याची गरज आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षाचा मी जिल्ह्यात मोठा भाऊ असल्यामुळे आता ही जबाबदारी माझी राहणार आहे. त्यामुळे राजी-नाराजी, किंतू-परंतु मनात ठेऊ नका. त्यासाठी आपण सर्वांनी भंडारा-गोंदिया जिल्हा भाजपमुक्त करण्यासाठी एकदिलाने काम करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले. यावेळी खा.पटेल म्हणाले, केंद्र आणि राज्य शासनाने वारेमाप घोषणा दिल्या परंतु प्रत्यक्षात घोषणांची अमंलबजावणी झालेली नाही. सर्वच स्तरात असंतोष पसरलेला आहे. आता सर्वांनी मिळून केंद्र व राज्य सरकारचे अपयश जनतेसमोर मांडा, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Nominations of Nationalist Congress Party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.