उपकरणांमुळे नाही, तर वर्तनामुळे मनुष्याची ओळख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:14 AM2018-02-19T01:14:48+5:302018-02-19T01:15:25+5:30
मोबाईलच्या विळख्यात अडकत चाललेल्या नविन पिढीबद्दल व देशात वाढत चाललेल्या विद्वेषाबद्दल चिंता वाढली आहे. नविन पिढीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.
ऑनलाईन लोकमत
भंडारा : मोबाईलच्या विळख्यात अडकत चाललेल्या नविन पिढीबद्दल व देशात वाढत चाललेल्या विद्वेषाबद्दल चिंता वाढली आहे. नविन पिढीला आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे. उपकरणांमुळे नाही तर वर्तनामुळे माणूस ओळखला जातो, असे प्रतिपादन नागपूर विद्यापिठाचे माजी कुलगुरु डॉ. हरीभाऊ केदार यांनी केले.
जे. एम. पटेल महाविद्यालयात वार्षिकोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. बक्षीस वितरण कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून पी. पी. अध्यापक महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. के. एम. भांडारकर, अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. विकास ढोमणे होते. मंचावर अधिष्ठाता व वार्षिकोत्सवाचे प्रभारी डॉ.कार्तिक पनिकर, स्टॉफ कॉन्सिलचे सचिव डॉ. उमेश बन्सोड, जे. एम. पटेल कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. एस. एस. चानखोरे व विद्यार्थी परिषदेचे सचिव शुभम वनवे उपस्थित होते.
प्राचार्य डॉ. विकास ढोमणे यांनी वर्ग प्रतिनिधींना सेवा व कर्तव्याची शपथ दिली. डॉ.विकास ढोमणे यांनी आपल्या प्रास्ताविकात रा.तु.म. नागपूर विद्याापीठाचे नवनिर्वाचित सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे व सरीता निंबार्ते याचें स्वागत केले. दिपाली शहारे व कल्याणी बेन्देवार या शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या विद्यार्थीर्नींचा अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्राचार्य डॉ. ढोमणे यांनी प्रास्ताविक केले.
विद्यार्थी परिषदेचे सचिव शुभम वनवे याने महाविद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला. यात महाविद्यालयाच्या विविध उल्लेखनीय बाबींचा व एनएसएस, एनसीसीच्या विविध उत्कृष्ट उपक्रमांचा उल्लेख केला.
माजी प्राचार्य डॉ. के. एम. भांडारकर यांनी बहारदार भाषणाने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले. तंत्रज्ञानाच्या वापरासोबत तंत्रज्ञान विकसित करण्याचे कौशल्यही आपण आत्मसात केले पाहिजे असे त्यांनी आवर्जून सांगितले. जातीपातीची बंधने तोडून विद्याथ्यार्नी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यष संपादीत करण्यासाठी प्रयत्न करावेत असेही त्यांनी सांगितले.
बीएसस्सी ची विद्यार्थ्यांनी कु. नेहा हटवार हिने सादर केलेल्या सत्यम-षिवम-सुंदरम या सदाबहार गीताने रसिकांची मने जिंकली. याप्रसंगी आचार्य पदवी प्राप्त करणाऱ्या डॉ.अनिता जायस्वाल, डॉ. प्रकाष सिंग, डॉ. भारती बारापात्रे यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राष्ट्रीय, राज्य व विद्यापिठ स्तरावर उत्कृष्ट कामगीरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा तसेच विद्यापीठाच्या व नागपूर बोर्डाच्या शांलात परिक्षेत विशेष नेत्रदीपक यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी पारीतोशीक देवून सत्कार करण्यात आला. वार्षिकोत्सवाच्या निमित्ताने महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांच्या विजेत्यांना स्मृतीचिन्ह देवून गौरविण्यात आले.
महाविद्यालयाचे अधिष्ठाता व वार्शिकोत्सवाचे प्रभारी डॉ.कार्तिक पनिकर यांनी आभार केले. कार्यक्रमाच्या यषस्वीतेसाठी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी, एनएसएस व एनसीसीचे स्वयंसेवक, स्टुडंट कॉन्सिलचे सर्व सदस्य आदिंचे मोलाचे सहकार्य लाभले.