हिरकणी कक्ष नव्हे हे तर गोदामच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 11:58 PM2017-12-14T23:58:42+5:302017-12-14T23:58:59+5:30

‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत शौचालय वापरण्याचे आवाहन करणारी जाहिरात दूरचित्रवाहिन्यांवर दाखवली जाते. परंतु स्तनदा मातांसाठी सुरू केलेल्या ‘हिरकणी कक्ष’ वापराची जागृती करण्यासाठी राज्य सरकारकडून काहीही केले जात नसल्याचे समोर आले आहे.

Not a diamond room but a warehouse! | हिरकणी कक्ष नव्हे हे तर गोदामच !

हिरकणी कक्ष नव्हे हे तर गोदामच !

Next
ठळक मुद्दे ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत शौचालय वापरण्याचे आवाहन करणारी जाहिरात दूरचित्रवाहिन्यांवर

देवानंद नंदेश्वर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांतर्गत शौचालय वापरण्याचे आवाहन करणारी जाहिरात दूरचित्रवाहिन्यांवर दाखवली जाते. परंतु स्तनदा मातांसाठी सुरू केलेल्या ‘हिरकणी कक्ष’ वापराची जागृती करण्यासाठी राज्य सरकारकडून काहीही केले जात नसल्याचे समोर आले आहे. भंडारा येथील एसटी बसस्थानकात हा कक्ष स्थापन केला, खरा परंतु त्याचा उपयोग केवळ गोदाम म्हणून केला जात असल्याचे ‘लोकमत’च्या पाहणीत उघडकीला आले.
गुरूवारला दुपारी २.२५ वाजताच्या सुमारास भंडारा बसस्थानकाची पाहणी करण्यात आली असता हिरकणी कक्षाचा दरवाजा अर्धवट सुरू असल्याचे दिसले. आत स्तनदा माता असतील, यामुळे सदर प्रतिनिधीने कक्षात प्रवेश केला नाही. मात्र कक्षातून एक सफाई कर्मचारी बाहेर आल्यानंतर त्याच्याशी चर्चा केली असता तेव्हा हिरकणी कक्षातील सत्य बाहेर आले. प्रतिनिधीने हिरकणी कक्षात प्रवेश केला असता, तिथे साहित्य अस्ताव्यस्त पसरलेले दिसून आले. एका कोपºयात एक पुरुष व दोन महिला सफाई कामगार जेवन करीत होते.
दुसºया कोपºयात एक युवक खुर्चीवर बसून टेबलावरील पुस्तक वाचत होता. त्याच्याशी चर्चा केली असता त्या युवकाने सफाई कामगार असल्याचे सांगितले. आम्हाला कक्ष उपलब्ध नसल्यामुळे साफसफाईचे साहित्य या कक्षात ठेवले आहे. स्तनदा माता कक्षात आल्यानंतर आम्ही कक्षाबाहेर जातो, असे सांगितले.
‘सबका साथ-सबका विकास’ अशी घोषणा करणाºया सरकारने महिलांच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये महत्त्वाचा असलेला ‘हिरकणी कक्ष’ ही केवळ जागृती आणि विश्वासार्हता नसल्याने दुर्लक्षित आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रवास करणाºया अनेक महिलांना तान्हुल्याला स्तनपान करण्यासाठी बसण्याला जागा मिळत नाही. अस्वच्छतेमुळे आजूबाजूला तशी परिस्थितीही नसते. अशावेळी महिलांची कुचंबणा होते. पर्यायाने भुकेने बाळाचे हाल होतात. ही गरज ओळखून राज्यातील बसस्थानकात ‘हिरकणी कक्ष’ स्थापन करण्यात आले आहे. हा कक्ष कशासाठी? यासाठी त्यामध्ये ‘समानता’ ठेवण्यात आली. मात्र निरक्षरांनाही लक्षात यावे, यासाठी त्यावर हिरकणी कक्ष असल्याचे चित्र दिसून आले नाही.
या कक्षाविषयी म्हणावी तेवढी जागृती न केल्याने असा कक्ष येथे आहे, याची माहितीच प्रवाशांना होत नसल्याचे पाहणीतून लक्षात आले. ज्यांना ते माहित आहे, त्यांच्या मनात या ठिकाणाविषयी विश्वासार्हता असणे आवश्यक आहे. ही विश्वासार्हता निर्माण करण्याला आणि मुळातच या कक्षाविषयी जागृती करण्याला महामंडळ कमी पडले आहे, यात तीळमात्र शंका नाही.

हिरकणी कक्ष स्थापनेला तीन वर्षांचा कालावधी झाला आहे. मात्र, कक्षामध्ये स्तनदा मातांचा ‘रिस्पॉन्स’ मिळत नाही. त्यांच्यासाठी एक खूर्ची व टेबलची व्यवस्था केली आहे. स्तनदा मातांना बसस्थानक प्रमुख मार्गदर्शन करीत असतात. कक्षामध्ये एका कोपºयात साहित्य ठेवले आहेत. स्तनदा मातांनी हिरकणी कक्षाचा लाभ घ्यावा.
-फाल्गुन राखडे,
आगार व्यवस्थापक, भंडारा़

Web Title: Not a diamond room but a warehouse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.