महामार्ग नव्हे, हा तर मृत्यूमार्गच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 10:39 PM2018-01-31T22:39:33+5:302018-01-31T22:40:33+5:30

लाखनी, मुरमाडी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने अपघाताच्या घटना वेळोवेळी घडत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा लाखनी परिसरातील जनतेसाठी मृत्यूमार्ग बनला आहे.

Not the highway, this is the only way to death | महामार्ग नव्हे, हा तर मृत्यूमार्गच

महामार्ग नव्हे, हा तर मृत्यूमार्गच

Next
ठळक मुद्देलाखनी शहरात ६३ अपघात : महामार्गावर गतीरोधकांची गरज

चंदन मोटघरे ।
आॅनलाईन लोकमत
लाखनी : लाखनी, मुरमाडी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्याने अपघाताच्या घटना वेळोवेळी घडत असतात. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग हा लाखनी परिसरातील जनतेसाठी मृत्यूमार्ग बनला आहे. वाढते अपघाताचे प्रमाणामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाद्वारे उड्डाण पुलाला मंजुरी मिळाली असली तरी प्रत्यक्षात काम सुरु व्हायला उशिर आहे. तसेच उड्डाणपुलाचे काम तीन वर्षे चालणार असल्याने वाहतुकीचे नियंत्रण करणे अशोका बिल्डकॉम कंपनी व पोलीस स्टेशन समोर मोठे आवाहन असणार आहे.
मागील वर्षी सन २०१७ ला लाखनी पोलीस स्टेशन अंतर्गत मुंडीपार ते केसलवाडा (फाटा) दरम्यान एकुण ६३ अपघात झाले आहेत. एकुण अपघातापैकी २० अपघातामध्ये २० लोक जागीच मरण पावले आहेत. तसेच ४३ अपघातामध्ये गंभीर जखमी व कायमचे अपंगत्व आलेले आहेत. याबाबत जनतेच्या मनात राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस ठाणे अधिकारी व कर्मचारी यांचे बद्दल प्रचंड दोन्ही बाजूला दाट लोकवस्ती, शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यालय, न्यायालय असल्याने जनतेचे महामार्ग ओलांडून जाण्याचे प्रमाण जास्त आहे.
अशोका बिल्डकॉम कंपनीकडे ठाणेदार यशवंत सोलसे यांनी पत्रव्यवहार करून पेट्रोलपंप चौक, तहसील चौक, सिंधी लाईन, लाखोरी फाटा, बसस्टॉप, मानेगाव फाटा, पिंपळगाव फाटा, मुंडीपार फाटा येथे गतीरोधक तात्काळ बसविण्यात येणे आवश्यक आहे.
लाखनी शहराचा आठवडी बाजार मंगळवारला भरतो. आठवडी बाजारासाठी स्वतंत्र जागा आहे. परंतु गेल्या तीन वर्षापासून अर्धेधिक आठवडी बाजार राष्ट्रीय महामार्गाच्या सर्व्हीस रोडवर भरतो व राष्ट्रीय महामार्गावर लोक वाहने उभी करत असतात. तहसील चौकापासून ते सिंधी लाईन चौक पर्यंतच्या सर्व्हीस रोडवर भाजीपाल्यांची दुकाने लागलेली असतात. राष्ट्रीय महामार्गावर मार्चनंतर उड्डाणपुलाचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे आठवडी बाजार हलविणे किंवा मुळ जागेवर नेणे आवश्यक असणार आहे. यापूर्वी महामार्गावरील सर्व्हीस रोडचे आठवडी बाजाराची दुकाने हटविण्यासाठी अशोका बिल्डकॉन व पोलीस विभागाने प्रयत्न केले. परंतु त्यांना यश मिळाले नाही. भाजीविक्रेते प्रशासनाला जुमानत नसल्याने अपघाताची घटना घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अवैध पार्किंगची समस्या
राष्ट्रीय महामार्गावर मुख्य रस्त्यावर ट्रक व इतर वाहने उभी असात तर सर्व्हीस रोडवर, ट्रक, मिनीडोअर, कार, आॅटो आदींची पार्कींग केली जाते. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. लाखनीच्या मुख्य बसस्थानकाजवळ, लाखोरी रोड फाटा, जयस्तंभ चौक, बाजार चौक, तहसील कार्यालयासमोरील चौका काळीपिवळी आॅटो उभे असतात. बाजार चौक व तहसील चौकातील आॅटोचालकाच्या प्रवासी वाहतुकीला जनता कंटाळली आहे. बस थांबण्याच्या जागेवर आॅटो उभे असतात. त्यामुळे अनेकदा बसला थांबण्यासाठी जागा नसते व बसवाहक गाडी पुढे नेतात. यामुळे आॅटोवाहकासाठी नियमावली असणे आवश्यक आहे.

Web Title: Not the highway, this is the only way to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.