झाडे लावणेच नव्हे, तर त्यांचे संवर्धन करणेही गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:32 AM2021-07-26T04:32:24+5:302021-07-26T04:32:24+5:30
खातिया : झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून, त्याचे दुष्परिणाम आता बघावयास मिळत आहेत. अशात जास्तीत जास्त झाडे ...
खातिया : झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून, त्याचे दुष्परिणाम आता बघावयास मिळत आहेत. अशात जास्तीत जास्त झाडे लावणे ही काळाची गरज आहे. मात्र, फक्त यावेळी झाडे लावणेच नव्हे तर त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हीसुद्धा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन विमानतळ संचालक विनय ताम्रकार यांनी केले.
बिरसी विमानतळ येथे भारतीय विमानपतन प्राधिकरणच्या वतीने अभिनव भारतच्या ७५व्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवानिमित्त मंगळवारी (दि. २०) आयोजित वृक्षारोपणमहोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी नयना गुंडे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, एनएफटीआईचे जीएम पेट्रीक मरसी, मुख्य उडान प्रशिक्षक दीपक चंद्रण, इग्रुआके सीएफआई बरनी शंकर, मुख्य सुरक्षा अधिकारी मिलेंद्र नीरमालकर, विमानतळ समितीचे सदस्य गजेंद्र फुंडे, एअरपोर्ट टर्मिनल प्रबंधक इंडियन ऑयलचे वसंत पारडीकर, पंकज वंजारी, विनोद नेताम आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी नीम, बाबूळ, गुलमोहर, करंजी आदी प्रजातींची एकूण ३० रोपटी विमानतळ परिसरात लावण्यात आली.
गेल्या अनेक वर्षांपासून बिरसी विमानतळाच्या वतीने अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत असून, पर्यावरण संतुलित ठेवण्याच्या उद्देशातून हे कार्यक्रम घेण्यात येत आहे.