सहा महिन्यांपासून मानधन मिळालेच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 10:42 PM2017-09-17T22:42:04+5:302017-09-17T22:42:57+5:30
शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविणाºया स्वयंपाकीण व मदतनीसाला गेल्या सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
राहुल भुतांगे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : शासनाच्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत अन्न शिजविणाºया स्वयंपाकीण व मदतनीसाला गेल्या सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रामाणिकपणे काम करुनही तुटपुंजे मानधनही वेळेवर मिळत नसेल तर जिवन जगावे तरी कसे? असा सवाल कर्मचारी करीत आहेत.
तुमसर शहरासह तालुक्यात एकूण २५३ शाळा आहेत. त्या त्या शाळेच्या पटसंख्येनुसार वर्ग १ ते वर्ग ५ व वर्ग ६ ते वर्ग ८ अशी दोन विभागात विभागणी करुन शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मध्यांनानंतर जेवू घालण्याची योजना शासनाने अमलात आणली. त्यानुसार शालेय व्यवस्थापन समितीकडून अती गरज महिलेला स्वयंपाकीण तसेच मदतनिस म्हणून एक हजार रुपये अशा तुटपुंज्या मानधनावर नियुक्ती करण्यात आली. गावात कोणतेही काम नाही व पोटाची खडगी भरणे ही तितकेच गरजेचे म्हणून त्या गोरगरीब महिलेनी ते काम स्विकारले. पंरतू गत मार्च महिन्यापासून तर आजतागत सहा महिन्याचा कालावधी लोटला तरी त्यांना मिळत असलेले तुटपुंजे मानधन मिळाले नसल्याने त्यांच्या कुटुंबियावर उपासमारीची पाळी आली आहे. तर दुसरीकडे शासन, पोषण आहाराकरिता शाळांना किरणा व तांदळज्ञची पुर्तता करते. अन्न शिजविण्याकरिता इंधन व भाजीपाला हे मुख्याध्यापक स्वत:च्या जवाबदारीवर खर्च करुन विद्यार्थ्यांना खावू घालतो. एक महिन्याचे मागणी पत्र सादर केल्यानंतर इंधन व भाजीपाला खर्च हा मुख्याध्यापकांना मिळतो. दर महिन्याच्या एक तारखेला केंद्र प्रमुखंच्या माध्यमातून खर्चाचे मागणी पत्र शालेय पोषण आहार विभागाकडे न चुकता पाठविले जातात. पंरतु त्यानाही मार्च महिन्यापासूनचे इंधन व भाजीपाल खर्च मिळाला नसल्याने मुख्याध्यापकांचीही डोकेदुखी वाढली आहे. शैक्षणिक प्रगत महाराष्टÑाचा गाजावाजा होत आहे. विद्यार्थ्यांत शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी म्हणून या योजनेची भुमिका महत्वाची असताना मात्र अन्न शिजविणाºया महिलांना सहा महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याने तालुक्यात शैक्षणिक प्रगत म्हणजे दिव्याखाली अंधार असल्याचा प्रकार जाणवत आहे.