दीड महिन्यात शाळेत जाणारा एकही नाही विद्यार्थी पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:55 AM2021-01-08T05:55:39+5:302021-01-08T05:55:39+5:30
जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरु झाल्या. सुरुवातीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. अद्यापही कारोनाचे संकट टळले नाही. सर्वांच्या ...
जिल्ह्यात २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीच्या शाळा सुरु झाल्या. सुरुवातीला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. अद्यापही कारोनाचे संकट टळले नाही. सर्वांच्या नजरा लसीकडे लागल्या आहेत. तरीसुध्दा घरी बसून काय करायचे म्हणून पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठवीत आहेत. आजघडीला नववी ते बारावीच्या ३४२ शाळांपैकी ३३७ शाळा सुरु झाल्या आहेत. मात्र अद्यापही विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्केच्या वर पोहचली नाही. शाळेतील बैठक व्यवस्था व अध्यापन करणाऱ्या शिक्षकांची कमतरता, तसेच कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी शाळेत एक दिवसाआड ५० टक्के विद्यार्थी शाळेत बोलावले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थी उपस्थितीच्या टक्केवारीत कमी दिसून येत आहे. विद्यार्थ्यांची दररोजची उपस्थिती ४१ ते ४५ टक्के दिसून येत आहे. सद्यस्थितीत २९ हजार ७७८ विद्यार्थी शाळेत येत आहेत. सर्व शाळेत आजही तपासणी करून विद्यार्थ्यांची काळजी घेतली जात आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यानंतर अध्ययन- अध्यापनाची गती वाढली आहे. अध्ययन करताना विद्यार्थी आनंदी दिसून येत आहेत.
जिल्ह्यातील नववी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकूण शाळा - ३४२
सुरू असलेल्या शाळा -३३७
एकूण विद्यार्थी - ६६३०६
विद्यार्थ्यांची उपस्थिती -२९७७८
तालुका एकूण विद्यार्थी उपस्थिती
भंडारा १४२१४ ७६३९
मोहाडी ८१९६ २८३१
तुमसर १२६०३ ४८४१
लाखणी ७७६१ ३०७२
साकोली ८२८३ ३९६७
लाखांदूर ६५२६ ३४७३
पवनी ८७२३ ३९५५
शिक्षण विभागाच्या निर्देशाप्रमाणे शाळा सुरू आहेत. शाळा सुरू झाल्याचा आनंद पालक व शिक्षकांना झाला आहे. जिल्ह्यात अद्याप एकही विद्यार्थी संक्रमित नाही. पालकांनी विद्यार्थी शाळेत पाठविण्यास हरकत नाही.
- संजय डोर्लिकर
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, भंडारा