सूचना- बातमी वाचता येत नाही. सावधान आता नियमांचे उल्लंघन केल्यास होणार दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:37 AM2021-04-09T04:37:25+5:302021-04-09T04:37:25+5:30
मात्र शासनाने जारी केलेल्या नियमावलीचे नागरिकांनी उल्लंघन केल्यास पोलीसांकडून सदर व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ...
मात्र शासनाने जारी केलेल्या नियमावलीचे नागरिकांनी उल्लंघन केल्यास पोलीसांकडून सदर व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यात पोलीस विभागाच्या वतीने जनजागृती करण्यात आली आहे.
सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी ७ ते रात्री ८ दरम्यान जमावबंदी राहणार आहे. याअंतर्गत पाच पेक्षा अधिक लोकांच्या जमावास बंदी राहील. शुक्रवार रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ या काळात कोणत्याही व्यक्तीस वैध कारणाशिवाय किंवा सदर आदेशात नमूद अत्यावश्यक सेवेच्या कामाशिवाय सार्वजनिक रित्या बाहेर निघण्यास- फिरण्यास पुर्णतः मज्जाव करण्यात आला आहे. या नियमांचे जिल्हावासीयांकडून काटेकोर पालन होणे अपेक्षित असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी सांगितले.
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने 'ब्रेक दि चेन' धोरण जाहीर केले असून लोकांनी कोरोनाग्रस्त रुग्णांचे संपर्कात येऊ नये, तसेच सार्वजनिक किंवा खाजगी जागेत गर्दी करू नये, कार्यक्रम आयोजित करू नये असे निर्देश आहेत. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करणार आहेत.
वैद्यकीय सेवा आणि इतर अत्यावश्यक सेवा यांना वरील आदेशातून सूट देण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ, सर्व दुकाने, शॉपिंग कॉम्प्लेक्स हे पुर्णतः बंद राहतील. दळणवळण सोयी सुविधा या शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार असतील. रात्रौकालीन संचारबंदी, अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक बाबी, दुकाने, बाजारपेठ, सार्वजनिक वाहतूक, कार्यालये, खाजगी वाहतूक, करमणूक, उपहारगृहे व बार, धार्मिक स्थळे, हेअर सलून, ब्युटी पार्लर, वृत्तपत्रे, शाळा महाविद्यालये, धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम, रस्त्यावरील खाद्य दुकाने, उत्पादनक्षम क्षेत्र, ऑक्सिजन उत्पादक, इकॉमर्स, को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, बांधकाम याबाबत जिल्हाधिकारी संदिप कदम यांनी ०५ एप्रिल २०२१ रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पालन होणे अत्यंत गरजेचे आहे. उपरोक्त आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. ०८लोक ०५ के
बॉक्स
विना मास्क फिरणाऱ्यांवर होणार दंड
कोरोना या संसर्गजन्य आजारावर मास्क हे अत्यंत प्रभावी औषध असून संक्रमण राखण्यासाठी प्रत्येकाने योग्य रितीने मास्क वापरणे गरजेचे आहे. मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर पोलीस सुद्धा दंडात्मक कारवाई करणार आहेत. नागरिकांनी मास्क वापरावे व पात्र लाभार्थ्यांनी आपले लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम व जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत जाधव यांनी नागरिकांना केले आहे.