आता पशुवैद्यकीय दवाखान्यात चारा बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2018 11:11 PM2018-03-12T23:11:23+5:302018-03-12T23:11:23+5:30

पशुपालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय म्हणजे जनावरांच्या आहारात हिरवा चारा. पशु आहारात चांगल्या प्रतिची हिरवी वैरण दिल्यास दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते....

Now fodder garden in veterinary hospital | आता पशुवैद्यकीय दवाखान्यात चारा बाग

आता पशुवैद्यकीय दवाखान्यात चारा बाग

Next
ठळक मुद्देलोकमत शुभवर्तमान : जनावरांच्या आहारात महत्त्व, ठोंबे मिळणार मोफत

आॅनलाईन लोकमत
भंडारा : पशुपालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय म्हणजे जनावरांच्या आहारात हिरवा चारा. पशु आहारात चांगल्या प्रतिची हिरवी वैरण दिल्यास दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते ही बाब शेतकऱ्यांना शास्त्रीय पद्धतीने समजावून सांगण्यासाठी पशुवैद्यकीय विभाग जिल्हा परिषदच्या वतीने वैनगंगा कृषी महोत्सवात हिरव्या वैरणीचे महत्व पटवून देणारा स्टॉल शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
जनावरांना सकस हिरवा आहार मिळावा व त्या माध्यमातून दूध उत्पादन वाढावे यासाठी जिल्ह्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात चारा बाग लावण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन फुके यांनी दिली. लेंडेझरी या ठिकाणी दीड एकरावर सर्व जातीची चारा बाग लावण्यात आली आहे.
जिल्ह्यातील १६ पशुवैद्यकीय दवाखान्यात २६ जातीच्या वैरणीची लागवड करण्यात येणार आहे. ज्याद्वारे शेतकºयांना आपल्या पशुधनासाठी हिरवा चारा उपलब्ध होणार आहे.
या रुचकर चाऱ्यामध्ये भरपूर उत्पादन मिळवून देण्याची क्षमता असते. हायब्रीड नेपियर गवत, गिनी गवत, अंजन गवत, पांढरी मुसळी, दशरथ गवत, शेवरी, स्टायलो, छाया, लसूण गवत व दिनानाथ गवत असे हिरव्या वैरणीचे प्रकार आहेत.
हा चारा जनावरांना नियमित दिल्यास दूध उत्पादन नक्कीच वाढते.
हिरव्या वैरणासाठी जिल्ह्यातील सर्वच पशुवैद्यकीय दवाखान्यात चारा बाग लावण्यात येणार आहे. या बागेतून शेतकºयांना वैरणीचे ठोंबे मोफत मिळणार आहेत. ज्या द्वारे शेतकरी आपल्या शेतात हिरवा उत्पादन करू शकतील. ज्याचा उपयोग करून दूध उत्पादनात वाढ करता येईल.
हिरव्या चाºयामुळे उत्पादनात दहा ते वीस टक्के निश्चित वाढ होते. ही सर्व प्रक्रिया या प्रदर्शनात शास्त्रीय पध्दतीने उपस्थितांना समजावून सांगितली

‘हायड्रोपोनिक्स’ हिरवा चारा
मातीचा वापर न करता कमी पाण्यावर हायड्रोपोनिक्स हिरवा तयार करण्याची पद्धत खूप चांगली आहे. ज्यांच्या कडे जमीन नाही ते शेतकरी सुद्धा घरी हा चारा तयार करू शकतात. एक किलो मक्यामध्ये ९ ते १२ किलो हायड्रोपोनिक्स चारा तयार होतो. हा चाºयामुळे दूध उत्पादनात मोठी वाढ होते.

Web Title: Now fodder garden in veterinary hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.