आता नोटांच्या शंका निरसनासाठी हेल्पलाईन

By Admin | Published: November 18, 2016 12:35 AM2016-11-18T00:35:15+5:302016-11-18T00:35:15+5:30

५००, १००० रूपयांच्या चलनी नोटांचा व्यवहारातील वापर थांबविल्यानंतर उदभवलेल्या परिस्थितीविषयी

Now the helpline for the discourage doubt of the notes | आता नोटांच्या शंका निरसनासाठी हेल्पलाईन

आता नोटांच्या शंका निरसनासाठी हेल्पलाईन

googlenewsNext

१०७७ क्रमांकावर सेवा उपलब्ध
भंडारा : ५००, १००० रूपयांच्या चलनी नोटांचा व्यवहारातील वापर थांबविल्यानंतर उदभवलेल्या परिस्थितीविषयी केंद्र शासनाने व राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयामुळे नागरिकांना असलेल्या शंकांचे निरसन व्हावे, यादृष्टिने जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन कक्षाची हेल्पलाईन सुरू केलेली आहे.
सदर हेल्पलाईन केंद्रामध्ये नागरिकांचे चलनी नोटांबाबतच्या शंकांचे निरसन करण्याकरीता बँकेच्या प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी १०७७ किंवा ०७१८४-२५१२२२ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. दरम्यान, ८ नोव्हेंबर रोजी चलनातून ५०० आणि १००० रूपयांच्या नोटा बंद करण्यात आल्यानंतर नागरिकांची बँक आणि एटीएम सेवा केंद्रासमोर रांगाच रांगा लागलेल्या होत्या. बॅकां आणि एटीएममध्ये आजही पुरेशी रक्कम नसल्यामुळे आणि अडीच हजार रूपये काढण्याची मुभा असल्यामुळे रांगा कायम आहेत. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Now the helpline for the discourage doubt of the notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.