आता लाखनी सीसीटीव्हीच्या नजरेत
By Admin | Published: September 11, 2015 01:03 AM2015-09-11T01:03:10+5:302015-09-11T01:03:10+5:30
वाढत्या गुन्हेगारी व गैरकृत्यांना आळा बसावा, यासाठी सुरक्षिततेच्या मार्गाचा अवलंब करणे आवश्यक असते.
चंदन मोटघरे लाखनी
वाढत्या गुन्हेगारी व गैरकृत्यांना आळा बसावा, यासाठी सुरक्षिततेच्या मार्गाचा अवलंब करणे आवश्यक असते. पुराव्याअभावी अनेक गुन्हेगार निर्दोष सुटतात. मुरमाडी / लाखनी तीन मुलींच्या प्रकरणामुळे महाराष्ट्राच्या नकाशावर आले. त्या प्रकरणाची संदिग्धता कायम आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ३ वरील मुरमाडी लाखनी महत्वपूर्ण गाव आहे. त्या ठिकाणी सुरक्षितता राहावी यासाठी मुरमाडी ग्रामपंचायतने सीसीटीव्ही कॅमेरा लावून प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवण्याचे काम करीत आहेत.
स्थानिक तहसील कार्यालय चौकात फिरता सीसीटीव्ही कॅमेरा उंचावर लावला आहे. ६०० मीटर लांबीची क्षमता असणार स्पीड डोम कॅमेरा चारही बाजूला फिरता राहणार आहे. १ जीबी मेमरी क्षमता असलेल्या कॅमेराचे कंट्रोल रुम तहसील कार्यालयात तयार करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ वरुन जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची नोंद कॅमेऱ्यात होणार आहे.
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या बक्षिस निधीतून १ लाख ३८ हजार रुपयाचे सीसीटीव्ही कॅमेराचे कंत्राट टेक्नोसॉफ्ट सॉल्यूशन नागपूर यांना कंत्राट दिले होते. कॅमेराने काम करणे सुरु केले असून प्रत्येक व्यक्तीवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. लाखनी मुरमाडी परिसरात घरफोडी अपघाताच्या घटना रात्री बेरात्री होत असतात. त्यावर अंकुश ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरा लावण्याची माहिती लोकमत प्रतिनिधीला सरपंच राजेश खराबे यांनी दिली. गाव सुरक्षित ठेवण्यासाठी १४ वित्त आयोगाच्या निधीतून अनेक ठिकाणी कॅमेरे लावण्यात येणार आहेत. लाखनीची लोकसंख्या २५ हजारावर आहे तर मुरमाडीची लोकसंख्या १५ हजारावर आहे. मुरमाडी येथील घटनेमुळे प्रत्येक नागरिकांची सुरक्षिेतता महत्वाची झाली आहे. गावाच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक चौक कॅमेरे लावून गैरकृत्यांना आळा घातला जाणार आहे.