आता उरल्या ‘अस्मितादर्शकारांच्या’ आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 10:58 PM2018-03-27T22:58:45+5:302018-03-27T22:58:45+5:30

‘आंबेडकरी साहित्यसृष्टी प्रज्ञाशक्तीचा अविष्कार आहे’ असे म्हणणाºया अस्मिताकार डॉ.गंगाधर पानतावने हे काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण आंबेडकरी साहित्य चळवळीवर शोककळा पसरली आहे.

Now the memories of the remaining 'assimilators' | आता उरल्या ‘अस्मितादर्शकारांच्या’ आठवणी

आता उरल्या ‘अस्मितादर्शकारांच्या’ आठवणी

Next
ठळक मुद्देआंबेडकरी साहित्य वर्तुळात शोककळा : २०१२ मध्ये भंडाऱ्यात शेवटचे व्याख्यान

आॅनलाईन लोकमत
भंडारा : ‘आंबेडकरी साहित्यसृष्टी प्रज्ञाशक्तीचा अविष्कार आहे’ असे म्हणणाºया अस्मिताकार डॉ.गंगाधर पानतावने हे काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण आंबेडकरी साहित्य चळवळीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या जाण्याने न भरून निघणारी हानी झाली असून आंबेडकरी चळवळ पोरकी झाली आहे.
आंबेडकरी साहित्य व चळवळ सांस्कृतिक पुनरुत्थानाची शक्ती आहे, असे विचारसूत्र त्यांनी अस्मितादर्श रौप्य महोत्सवी मेळाव्यात मांडले होते. त्यांच्या जाण्यामुळे भंडारा येथील आंबेडकरी चळवळीत कार्य करणारे आंबेडकरी साहित्यिक अमृत बन्सोड, माया उके, सी.एम. बागडे, डॉ.धनराज भिमटे, विनोद मेश्राम यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीगर्भ तत्त्वज्ञानातून ज्या अनेक चळवळी जन्माला आल्या आहेत. त्यात वाड:मयीन आणि सांस्कृतिक चळवळ मौलिक आहे. दास्यमुक्त आणि शोषणमुक्त माणूस आणि समाज निर्माण करण्याची विराट शक्ती ज्या आंबेडकरी तत्त्वज्ञानात आहे, त्याचेच अपत्य म्हणजे अस्मितादर्श असे डॉ.गंगाधर पानतावणे म्हणायचे.
सृजनशील तथा वैचारिक आणि संशोधनपर साहित्य निर्मितीचा सशक्त मागोवा घेणाºया अनेक पिढ्या ‘अस्मितादर्श’ने घडविल्या आणि प्रथितयश नवोदित साहित्य निर्मात्यांचा संवाद निर्माण व्हावा यासाठी सन १९७४ मध्ये पहिला अस्मितादर्श लेखक-वाचक मेळावा औरंगाबाद येथे घेण्यात आला. आता या मेळाव्याचे रूपांतर साहित्य संमेलनात झाले आहे, असेही अमृत बन्सोड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
आंबेडकरवादी साहित्यकांची मोठी फळी उभारणारे अस्मितादर्शकार डॉ.गंगाधर पानतावणे यांचे भंडारा नगरीत सन २०१२ मध्ये शेवटचे व्याख्यान झाले. त्यापूर्वी ८ व ९ मे १९८१ रोजी भंडारा जिल्हा दलित साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि त्यानंतर २७ व २८ डिसेंबर १९९१ रोजी भंडारा जिल्हा बौद्ध साहित्य व सांस्कृतिक मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होते. त्यानंतर भंडारा येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात ३० एप्रिल व १ मे २००५ रोजी आयोजित फुले-आंबेडकरी साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून ते भंडारा येथे आले होते. या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष माया उके तर सचिव अमृत बन्सोड होते. या संमेलनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला होता. या संमेलनात त्यांनी देशात विषमता, विकृती, विघटन मोठ्या प्रमाणात आहे. विकृतीला संस्कृती, अन्यायाला न्याय या दिशेने समाजाची वहिवाट सुरु आहे. समता प्रस्थापित करण्यासाठी समाजाची पुनर्बांधणी बाबासाहेबांना करायची होती, हे झाले तर समतेवर आधारित नवी संस्कृती अस्तित्वात येईल असे प्रतिपादन डॉ.पानतावणे यांनी केले होते. आज त्यांच्या आठवणींनी आंबेडकरी साहित्य वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Web Title: Now the memories of the remaining 'assimilators'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.