आता रिक्षाचालक - मालकांना मिळणार विमा, आर्थिक मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 12:53 PM2024-08-05T12:53:20+5:302024-08-05T12:54:01+5:30

नियमावलीही प्रसिद्ध : विविध योजनांचा मिळणार लाभ

Now rickshaw pullers-owners will get insurance, financial help | आता रिक्षाचालक - मालकांना मिळणार विमा, आर्थिक मदत

Now rickshaw pullers-owners will get insurance, financial help

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :
रिक्षाचालकांसाठी राज्य शासनाने कल्याणकारी महामंडळ स्थापन केले आहे. त्याअंतर्गत चालक- मालकांना विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. त्या योजनांच्या अंमलबजावणीबाबत राज्य शासनाने नियमावलीही प्रसिद्ध केली आहे.


शासनाच्या योजनेतून रिक्षाचालकांचे कल्याण होणार आहे. योजनेची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास जिल्ह्यातील हजारो रिक्षाचालकांपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ पोहोचणार आहे. या निर्णयाचे शहरातील रिक्षाचालकांनी स्वागत केले आहे. रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी महामंडळ निर्माण करावे, अशी मागणी इतर रिक्षाचालक संघटनांची होती. यासाठी अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली होती. आतापर्यंत शासनाने काही वेळेस घोषणा केल्या. पण, अंमलबजावणी झाली नव्हती. रिक्षाचालकांची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतली.


रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळ 
रिक्षाचालकांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना राबवणे, मंडळाच्या कल्याणकारी निधीचे विनियोजन व व्यवस्थापन करणे, रिक्षा चालकांना सामजिक सुरक्षा देण्याची जबाबदारी या मंडळावर राहणार आहे.


असा मिळवा रिक्षाचालकांना लाभ

  • रिक्षाचालकांनी लाभासाठी जिल्हा कार्यालयांमध्ये विहीत नमुन्यात अर्ज करावा. प्रत्येक अर्ज जिल्हास्तरीय समितीकडून त्यांना दिलेल्या निकषानुसार पात्रतेसाठी तपासला जाईल.
  • राज्यस्तरीय मंडळ व जिल्हास्तरीय समितीने वेळोवेळी विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार लाभ वितरित केले जातील. यामुळे रिक्षाचा- लकांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा प्रदान होणार आहे.


कल्याणकारी योजनांचा लाभ

  • शहरात कार्यरत रिक्षाचालकांना कल्याणकारी योजनांचा लाभ होणार आहे. प्रत्येक रिक्षाचालकाने आपली नोंदणी आपापल्या संघटनेकडे करून घ्यावी.
  • यापूर्वी संघटनांनी दिलेल्या लढ्याचे हे यश आहे. लवकरच या योजनांची अंमलबजावणी होणार असल्याने लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.


३,००० रिक्षा चालक जिल्ह्यात कार्यरत
भंडारा जिल्ह्यात सुमारे तीन हजारांहून अधिक रिक्षाचालक असून, या योजनेचा लाभ पात्र रिक्षाचालकांना मिळू शकणार आहे.


रिक्षाचालकांना काय मिळणार?

  • आरोग्य विमा : जीवनविमा व अपंगत्व विमा योजना तसेच आरोग्यविषयक लाभ मिळणार आहेत.
  • दुखापत झाल्यास अर्थसाहाय्य : कर्तव्यावर असताना दुखापत झाल्यास अर्थसहाय्य योजनेंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार आहे.

Web Title: Now rickshaw pullers-owners will get insurance, financial help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.