आता बैलगाडीतून रेती तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:34 AM2018-12-13T00:34:11+5:302018-12-13T00:34:45+5:30

ट्रक, ट्रॅक्टर आणि वाहनांच्या माध्यमातून होणारी रेती तस्करी जिल्ह्यासाठी नवीन नाही. शेकडो ब्रास रेतीची खुलेआम दररोज तस्करी होत आहे. रस्ता उखडत असल्याने काही गावातून वाहनांना बंदी आणली. त्यामुळे रेती तस्करानी आता चक्क बैलागडीच्या सहाय्याने रेती तस्करी सुरु केली आहे.

Now smuggle sand from the bullock cart | आता बैलगाडीतून रेती तस्करी

आता बैलगाडीतून रेती तस्करी

Next
ठळक मुद्देनवा फंडा : पिपरी-परसोडी घाटावरून होतेय वाहतूक

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंडउमरी : ट्रक, ट्रॅक्टर आणि वाहनांच्या माध्यमातून होणारी रेती तस्करी जिल्ह्यासाठी नवीन नाही. शेकडो ब्रास रेतीची खुलेआम दररोज तस्करी होत आहे. रस्ता उखडत असल्याने काही गावातून वाहनांना बंदी आणली. त्यामुळे रेती तस्करानी आता चक्क बैलागडीच्या सहाय्याने रेती तस्करी सुरु केली आहे. साकोली तालुक्यातील पिपरी- परसोडी घाटावर आता बैलगाडीतून रेती वाहतूक सुरु आहे.
भंडारा जिल्ह्यात गत अनेक वर्षांपासून रेतीचा गोरख धंदा सुरु आहे. दररोज हजारो ब्रास रेतीचे उत्खनन करुन परजिल्ह्यात त्याची विक्री केली जात आहे. यंदातर रेती घाटांचा लिलाव रखडला असतांनाही मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन सुरु आहे. महसूल प्रशासन यावर कोणतीही कारवाई करीत नाही. त्यामुळे काही गावातील नागरिकांनी आता पुढाकार घेतला आहे. पिपरी- परसोडी परिसरात अहोरात्र होणाऱ्या वाहतुकीने रस्ते उखडत आहेत. त्याचा त्रास गावकºयांना सहन करावा लागतो. त्यामुळे या परिसरातील काही गावात रेती तस्करी करणाºया वाहनांना बंदी आणली. मात्र यावर आता या तस्करांनी पर्याय शोधून रेती घाटातून बैलगाडीच्या सहाय्याने रेती आणली जात आहे. ३०० रुपये बैलगाडीप्रमाणे गावात रेतीची विक्री केली जाते. तर बाहेरगावांसाठी ४०० रुपये प्रमाणे विक्री होत आहे. एका बैलगाडीच्या दिवसाला चार ते पाच ट्रिप होतात. त्यामुळे अनेकजण आता बैलगाडीने रेतीने तस्करी करीत आहेत. गोंडउमरी परिसरात हा प्रकार दिवसाढवळ्या सुरु आहे. परंतु तहसील प्रशासन त्यांच्यावर कोणतीच कारवाई करताना दिसत नाही.
महसूलचे दुर्लक्ष
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रेतीची तस्करी होत आहे. या तस्करीला आळा घालण्याची मुख्य जबाबदारी महसूल प्रशासनाची आहे. महसूल विभागाने पथकही तयार केले आहेत. परंतु लहानसहान कारवायांपलिकडे कोणतीही कारवाई झाली नाही. अनेक तस्करांशी हितसंबंध गुंतल्याचेही दिसून येते.

Web Title: Now smuggle sand from the bullock cart

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :sandवाळू