न.प. मोफत इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणजे पर्वणीच

By admin | Published: July 10, 2017 12:17 AM2017-07-10T00:17:03+5:302017-07-10T00:17:03+5:30

आधुनिक युगात तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे.

N.P. A free English medium school is a place of excellence | न.प. मोफत इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणजे पर्वणीच

न.प. मोफत इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणजे पर्वणीच

Next

चरण वाघमारे यांचे प्रतिपादन : न.प. इंग्रजी वर्गाचे प्रवेशोत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : आधुनिक युगात तंत्रज्ञानाचे महत्त्व लक्षात घेता इंग्रजी भाषेला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. परंतु इंग्रजी शिक्षण महागडे झाल्याने सर्वसामान्यांचे पाल्य वंचित राहत होते. अशांना समाज प्रवाहात आणण्यासाठी नगरपरिषद तुमसरने मोफत इंग्रजी माध्यमांची शाळा सुरु करून तुमसरकरांकरिता पर्वणीच उपलब्ध करून दिल्याचे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी व्यक्त केले.
येथील न.प. माधवराव पटेल प्रायमरी शाळा येथे आयोजित केजी १, केजी २ वर्गाचे शुभारंभ व प्रवोशोत्सव कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, उपाध्यक्ष कांचन कोडवानी, तारिक कुरैशी, जिल्हाध्यक्ष भाजपा, नगरसेवक रजनिश लांजेवार, मेहताबसिंग ठाकुर, किशोर भवसागर, पंकज बालपांडे, प्रमोद घरडे, शिक्षण सभापती सचिन बोपचे, अर्चना भुरे, गीता कोंडेवार, छाया मलेवार, किरणदेवी जोशी मुख्याध्यापक थोटे मंचावर उपस्थित होते.
यावेळी वाघमारे यांनी, जिल्हा परिषद व नगर पालिकेमध्ये शिकविणाऱ्या शिक्षकांची तुलनात्मक परीक्षण करून सांगितले की जि.प. व न.प. मध्ये शिक्षकांची निवड ही सरळ सेवा भरतीने होते. त्यामुळे निश्चितच तेथील शिक्षक हा बुद्धीवान आहे. शैक्षणिक कार्य शिक्षकांकडून करून नो वर्क नो पेमेंटच्या धर्तीवर कार्य करण्याचा सल्ला दिला.
तर अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी, न.प. शाळेचा ढासळलेला दर्जा नव्याने उदयास आणण्याकरिता न.प. नेहरु शाळेचे प्राचार्य व शिक्षकांचे अभिनंदन करून हा दर्जा असाच उंचाविण्याकरिता न.प. ची संपूर्ण साथ द्यावी असे सांगितले. यावर्षी न.प. चार शाळेत इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरु केले. त्यास जनतेचा भरघोस प्रतिसाद दिला. अन्य शाळेतही दुसऱ्या सत्रात वर्ग सुरु करणार असल्याचे सांगितले.
प्रास्ताविक शिक्षण विभागाचे सभापती सचिन बोपचे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रकाश ब्राम्हणकर यांनी तर उपस्थितांचे आभार भास्कर उपरीकर यांनी मानले. यशस्वितेकरिता प्रशासक अधिकारी नितीन वाघमारे, शिक्षक कावळे, रायकवार, ढोके, वंजारी, जयतवार, मोहन बोरघरे यांनी सहकार्य केले.

Web Title: N.P. A free English medium school is a place of excellence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.