एनआरसी, सीएए विरोधात जिल्ह्यात मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 06:00 AM2020-01-25T06:00:00+5:302020-01-25T06:00:38+5:30
भंडारा शहरात येथील गांधी चौकातून वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो नागरीक सहभागी झाले होते. हातात फलक घेवून एनआरसी रद्द करा, अशा घोषणा देत होते. हा मोर्चा जिल्हा कचेरीसमोरील त्रिमुर्ती चौकात पोहचला. त्यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाअंतर्गत भंडारा येथे जिल्हा कचेरीवर मोर्चा काढण्यात आला. यासोबतच जवाहरनगर, लाखनी, मोहाडी येथेही आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात आंदोलन शांततेत पार पडले असून कुठेही अनुचित घटना घडली नाही. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
भंडारा शहरात येथील गांधी चौकातून वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यात शेकडो नागरीक सहभागी झाले होते. हातात फलक घेवून एनआरसी रद्द करा, अशा घोषणा देत होते. हा मोर्चा जिल्हा कचेरीसमोरील त्रिमुर्ती चौकात पोहचला. त्यावेळी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. शहरात पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला होता. मात्र कुठेही अनुचित प्रकार घडला नाही.
या मोर्चात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय शहारे, युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत सुर्यवंशी, महासचिव दीपक गजभिये, सुरेश खंगार, प्रशांत, महावीर घोडेस्वार, संघपाल तिरपुडे, शैलेश राऊत, आर.ए. चिमनकर, राहुल गजभिये, गनलाल मेश्राम, मुक्ती महबूब रजा मौलाना, मुक्ती साजीद मौलाना यांच्यासह मर्कजी सिरतुल्लबी कमिटीचे पदाधिकारी व वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. तसेच रिपब्लिकन सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देवून सीएए व एनआरसी कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन देताना अचल मेश्राम, अरुण गोंडाने, राहूल गजभिये, भीमराव टेंभूर्णे, अंकुश सुखदेवे, मुलचंद मेश्राम, बुद्धपाल डहाके, क्रिष्णा देशभ्रतार, सेवक तिरपुडे, भजनदास मेश्राम, सतीष मेश्राम, राहूल बडोले, महेंद्र देशपांडे, प्रदीप मेश्राम, राजू नंदेश्वर, सौरभ चवरे उपस्थित होते.