जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या घटू लागली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:37 AM2021-05-09T04:37:13+5:302021-05-09T04:37:13+5:30
कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होण्यामागचे कारण म्हणजे कोरोनामुक्त प्रमाण वाढणे होय. तसेही मे महिन्यात कोरोना चाचण्याही कमी झाल्या. ...
कोरोना ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होण्यामागचे कारण म्हणजे कोरोनामुक्त प्रमाण वाढणे होय. तसेही मे महिन्यात कोरोना चाचण्याही कमी झाल्या. त्यामुळे रुग्णसंख्याही कमी येऊ लागली. एप्रिल महिन्यात बाधित झालेले रुग्ण कोराेनामुक्त होऊ लागले. कोरोना रुग्णांचे आकडे कमी होऊ लागल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
बॉक्स
शनिवारी १२५९ कोरोनामुक्त, ५४८ पॉझिटिव्ह
जिल्ह्यात शनिवारी तब्बल १२५९ व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ४७ हजार ७२४ लोकांनी कोरोनावर विजय मिळविला आहे, तर ५४८ व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यात भंडारा १०८, मोहाडी २०, तुमसर ४०, पवनी ४०, लाखनी ६९, साकोली २५२, लाखांदूर १९ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत ५५ हजार ५११ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
बॉक्स
१२ जणांचा मृत्यू
शनिवारी जिल्ह्यात १२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यात भंडारा तालुक्यात सहा, तुमसर दोन, मोहाडी, लाखनी, साकोली आणि लाखांदूर तालुक्यात प्रत्येकी एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला. आतापर्यंत ९६३ व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला. त्यात सर्वाधिक भंडारा तालुक्यात ४५८, मोहाडी ८९, तुमसर १०७, पवनी ९८, लाखनी ७९, लाखांदूर ८९ आणि लाखांदूर तालुक्यातील ४३ व्यक्तींचा समावेश आहे. जिल्ह्यात मृत्यूदर १.७३ टक्के आहे.