जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा १४ हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:35 AM2021-03-10T04:35:41+5:302021-03-10T04:35:41+5:30
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंद असला तरी कोरोना रुग्णाचा आकडा १४ हजार पार झाला आहे. मंगळवारी ...
भंडारा : जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंद असला तरी कोरोना रुग्णाचा आकडा १४ हजार पार झाला आहे. मंगळवारी ४५ व्यक्तींचा अहवाल पाॅझिटिव्ह आला असून ४० व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळून आला होता. त्यानंतर रुग्णांची संख्या वाढत गेली. ९ मार्च रोजी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १४ हजार २० वर पोहचली आहे. त्यापैकी १३ हजार ३२५ व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. तर ३२७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. मंगळवारी १०९८ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ३२, मोहाडी २, तुमसर ३, पवनी ५ आणि लाखनी, साकोली, लाखांदूर येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला आहे. मंगळवारी कोरोनाने कुणाचाही मृत्यू झाला नाही. मृतांची संख्या सध्या ३२७ आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण भंडारा तालुक्यात आढळून आले आहेत. ५९३२ रुग्णांची येथे नोंद करण्यात आली. मोहाडीत १०८८, तुमसर १७८९, पवनी १३०९, लाखनी १५२३, साकोली १७२१ आणि सर्वात कमी लाखांदूर ६५८ रुग्णांची नोंद झाली. सध्या ३६८ रुग्ण उपचाराखाली आहेत. त्यात भंडारा तालुका २३७, मोहाडी १२, तुमसर ४८, पवनी २१, लाखनी ३३, साकोली १२ आणि लाखांदूर तालुक्यातील पाच रुग्णांचा समावेश आहे. नागरिकांनी लसीकरण करावे असे आवाहन केले आहे.