जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या निरंक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:40 AM2021-08-13T04:40:22+5:302021-08-13T04:40:22+5:30

गुरुवारी ३९९ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात कुणीही पाॅझिटिव्ह आढळून आला नाही. तसेच जिल्ह्यात सध्या एकही ॲक्टिव्ह रुग्ण नाही. ...

The number of Kareena patients in the district is staggering | जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या निरंक

जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या निरंक

googlenewsNext

गुरुवारी ३९९ व्यक्तींची चाचणी करण्यात आली. त्यात कुणीही पाॅझिटिव्ह आढळून आला नाही. तसेच जिल्ह्यात सध्या एकही ॲक्टिव्ह रुग्ण नाही. तसेच महिनाभरात कुणाचाही मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत चार लाख ४२ हजार ४४७ व्यक्तींची काेराेना चाचणी करण्यात आली. त्यात ५९ हजार ८११ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले. त्यापैकी ५८ हजार ६७८ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली, तर ११३३ व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला आहे.

गत महिनाभरापासून काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत गेली. ६ ऑगस्ट राेजी भंडारा जिल्हा काेराेनामुक्त झाला. माेहाडी तालुक्यातील एकमेव ॲक्टिव्ह रुग्ण त्यादिवशी काेराेनामुक्त झाला हाेता. त्यानंतर जिल्ह्यात कुठेही पाॅझिटिव्ह व्यक्ती आढळून आला नाही. जिल्हा काेराेनामुक्त झाल्याने आराेग्य यंत्रणेवरील ताण कमी झाला आहे. मात्र तिसऱ्या लाटेची भीती कायम असल्याने आराेग्य यंत्रणा सज्ज आहे. नागरिक मात्र काेराेना नियमांचे पालन करताना दिसून येत नसल्याचे शहरात दिसत आहे.

Web Title: The number of Kareena patients in the district is staggering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.