काेराेना रुग्णांची संख्या १५ हजार पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:32 AM2021-03-22T04:32:31+5:302021-03-22T04:32:31+5:30
भंडारा : विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत भंडारा जिल्ह्यात काेराेना संसर्गाचे प्रमाण कमी असले, तरी ११ महिन्यांत काेराेना रुग्णांची संख्या ...
भंडारा : विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत भंडारा जिल्ह्यात काेराेना संसर्गाचे प्रमाण कमी असले, तरी ११ महिन्यांत काेराेना रुग्णांची संख्या १५ हजार पार झाली आहे. जिल्ह्यात पहिला रुग्ण गतवर्षी २७ एप्रिल राेजी आढळला हाेता. रविवारी आढळलेल्या नवीन १२३ रुग्णांमुळे जिल्ह्यात आतापर्यंत पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या १५ हजार ९२ झाली आहे. त्यापैकी १३ हजार ७८९ व्यक्तींनी काेराेनावर मात केली, तर ३३० व्यक्तींना काेराेनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या ९७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
गतवर्षी देशात लाॅकडाऊन घाेषित झाल्यानंतर, तब्बल महिन्याभराने भंडारा जिल्ह्यात काेराेनाचा पहिला रुग्ण आढळला हाेता. २७ एप्रिल राेजी भंडारा तालुक्यातील गराडा येथील एक महिला काेराेनाबाधित आढळून आली हाेती. त्यानंतर, काेराेना रुग्णवाढीचा वेग अतिशय मंद हाेता. मे महिन्यात ३० रुग्ण आढळले हाेते. जून महिन्यात ४९, जुलैमध्ये १७० रुग्ण आढळले हाेते. मात्र, ऑगस्ट महिन्यापासून रुग्ण संख्या वाढायला लागली. ऑगस्ट महिन्यात १०३६, सप्टेंबर मध्ये ३९५८, ऑक्टाेबर ३०८१ आणि नाेव्हेंबर महिन्यात १५८४ काेराेना रुग्णांची नाेंद झाली हाेती. त्यानंतर, काेराेना रुग्णांची संख्या कमी हाेत गेली.
जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला तर जिल्हा काेराेनामुक्तीच्या वाटेवर हाेता. २५ ते ३० रुग्ण आढळून येत हाेते. मात्र, मार्च महिन्यात विदर्भासह महाराष्ट्रात रुग्णांची संख्या वाढायला लागली. भंडारा जिल्ह्यातही रुग्ण संख्या वाढत गेली. आतापर्यंत जिल्ह्यात १५ हजार ९२ व्यक्तीना काेराेनाची लागण झाली आहे. त्यात सर्वाधिक भंडारा तालुक्यातील रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात १३ हजार ७८९ व्यक्तींनी काेराेनावर यशस्वी मात केली आहे. तर ३३० व्यक्तींचा काेराेनाने मृत्यू झाला. जिल्ह्यात ९७३ ॲक्टिव्ह काेराेना रुग्ण असून, त्यात भंडारा ४५९, माेहाडी ४९, तुमसर ४४१, पवनी १६८, लाखनी ७९, साकाेली ५९, लाखांदूर १८ रुग्णांचा समावेश आहे.
बाॅक्स
रविवारी भंडारा तालुक्यात वृद्धाचा मृत्यू
जिल्ह्यात काेराेना रुग्णांचा मृत्युदर अत्यल्प असून, आतापर्यंत ३३० व्यक्तींचा बळी काेराेनाने गेला आहे. रविवारी भंडारा तालुक्यातील एका ७७ वर्षीय व्यक्तीचा काेराेनाने जिल्हा रुग्णालयाच्या काेविड आयसीयू वाॅर्डात झाला आहे. जिल्ह्यात काेराेना रुग्णांचा मृत्युदर २.१९ टक्के असून, बरे हाेण्याचे प्रमाण ९१.३७ टक्के आहे.
तालुकानिहाय काेराेना रुग्ण
तालुकाप्रगतीवरदैनंदिन
भंडारा ६४४४ ५०
माेहाडी ११४४ ०५
तुमसर १९४५ १०
पवनी १४८३ २८
लाखनी १६०९ २०
साकाेली १७९० ०८
लाखांदूर ६७७ ०२
एकूण १५०९२ १२३