रेल्वेची संख्या वाढली, थांबे मात्र वाढेनात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:37 AM2021-07-30T04:37:23+5:302021-07-30T04:37:23+5:30
इंद्रपाल कटकवार भंडारा : जिल्ह्यातून गेलेल्या रेल्वे मार्गावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रेल्वेंची संख्या वाढविण्यात आली असली तरी स्थानकावर ...
इंद्रपाल कटकवार
भंडारा : जिल्ह्यातून गेलेल्या रेल्वे मार्गावर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर रेल्वेंची संख्या वाढविण्यात आली असली तरी स्थानकावर थांबे मात्र देण्यात आलेले नाही.
भंडारा जिल्ह्यावर रेल्वेचे विशेषत: सुपरफास्ट गाड्यांचे थांबे देण्याबाबत पक्षपात करण्यात आला आहे. गोंदियाला सर्वाधिक रेल्वेचे थांबे देण्यात आले. मात्र, भंडारा रोड व तुमसर थांबे देण्यात मध्य रेल्वे प्रशासन कुचराई करीत असते. यासंबंधाने अनेकदा प्रवाशांनी मागणी केली आहे; मात्र निवेदनाला केराची टोपली दाखविण्यात आली. रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने निर्णय घेण्याची गरज आहे.
बॉक्स
या ठिकाणी रेल्वे कधी थांबणार?
भंडारा हे जिल्हा मुख्यालयाचे ठिकाण असतानाही या ठिकाणी बहुतांश एक्स्प्रेस व सुपरफास्ट गाड्या थांबत नाही. मुंबई ते हावडा या मार्गावर प्रवाशांची मोठी संख्या असते. एकट्या भंडारा रोड रेल्वे स्थानकातून सहा एक्स्प्रेस गाड्यांमधून शेकडो प्रवासी प्रवास करीत आहेत. जिल्ह्यातील प्रमुख रेल्वेस्थानक असतानाही दुसरीकडे थांबे देण्यात आले आहेत. नागपूरनंतर सरळ गोंदियाला अनेक गाड्यांचे थांबे आहेत. मात्र, जिल्हा मुख्यालय असतानाही महत्त्वपूर्ण रेल्वे गाड्यांचे थांबे का नाहीत याचे उत्तर लोकप्रतिनिधीही द्यायला तयार नाहीत. एकमेकांकडे अंगुली निर्देश केले जात आहे.
कोट
-
कोरोना काळात रेल्वे बंदच होती. हळूहळू रेल्वेचा प्रवास आता सुरू केला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू असल्या तरी बहुतांश अन्य एक्स्प्रेस व सुपरफास्ट एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे नाहीत. अन्य राज्यात जाण्यासाठी आम्हाला दुसऱ्या रेल्वे स्थानकाहून तिकीट आरक्षित करावी लागते. याकडे लोकप्रतिनिधींनी व रेल्वे प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.
- मोतीराम लुचे