सर्वसाधारण जागांवर ओबीसींना उमेदवारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2021 05:00 AM2021-12-19T05:00:00+5:302021-12-19T05:00:47+5:30
सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या सर्व ५२ व पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची घाेषणा केली हाेती. ६ डिसेंबर या अखेरच्या दिवशी नामांकन दाखल केले हाेते. मात्र, ओबीसी प्रवर्गातील निवडणूक स्थगित झाली. त्या प्रवर्गासाठी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार उभे केले हाेते. आता ओबीसी प्रवर्गातील निवडणुका सर्वसाधारण प्रवर्गातून हाेत आहेत. त्यामुळे याच उमेदवारांना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे.
लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आल्याने आता हाेणाऱ्या सर्वसाधारण जागांवरील निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी ओबीसी समाजातीलच उमेदवार देण्याची तयारी चालवली आहे. नागपूर जिल्हा परिषद निवडणुकीत झालेला प्रयाेग भंडारा जिल्ह्यातही हाेत आहे. जिल्हा परिषदेच्या १३ आणि पंचायत समितीच्या २५ जागांसाठी हाेणाऱ्या निवडणुकीत ठरलेल्या उमेदवारांना पुन्हा संधी दिली जाणार आहे. केवळ महिला आरक्षणानंतर काय बदल हाेताे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सर्वाेच्च न्यायालयाच्या निकालाने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. त्यामुळे ६ डिसेंबर राेजी भंडारा जिल्हा परिषदेतील १३ आणि पंचायत समितीच्या २५ जागांवरील निवडणूक स्थगित करण्यात आली. उर्वरित सर्व जागांवरील निवडणूक हाेत आहे. निवडणूक लांबणीवर जाण्याची शक्यता वर्तविली जात असताना राज्य निवडणूक आयाेगाने स्थगित केलेल्या जागांची निवडणूक सर्वसाधारण प्रवर्गातून घेण्याचे आदेश निर्गमित केले. त्यानुसार कार्यक्रम घाेषित झाला. आता १८ जानेवारी राेजी मतदान हाेत आहे.
सुरुवातीला जिल्हा परिषदेच्या सर्व ५२ व पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांची घाेषणा केली हाेती. ६ डिसेंबर या अखेरच्या दिवशी नामांकन दाखल केले हाेते. मात्र, ओबीसी प्रवर्गातील निवडणूक स्थगित झाली. त्या प्रवर्गासाठी सर्वच पक्षांनी आपले उमेदवार उभे केले हाेते. आता ओबीसी प्रवर्गातील निवडणुका सर्वसाधारण प्रवर्गातून हाेत आहेत. त्यामुळे याच उमेदवारांना पुन्हा संधी देण्याची शक्यता आहे.
ओबीसी समाजाला काेणताही राजकीय पक्ष नाराज करण्याच्या तयारीत नाही. जिल्ह्यात माेठ्या प्रमाणात ओबीसी समाज आहे. हा घटक निवडणुकीवर प्रभाव पाडू शकताे. त्यामुळे सर्वच पक्ष ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानंतरही सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी देण्याच्या मानसिकतेत आहेत. मात्र अशा परिस्थितीत ओबीसी संघटना निवडणुकीत काेणती भूमिका घेतात याकडेही सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
ओबीसी समाजाच्या भूमिकेकडे लक्ष
- राजकीय आरक्षण गेल्याने संतप्त असलेला ओबीसी समाज या निवडणुकीत काय भूमिका घेताे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही संघटनांनी आरक्षण नाही तर मतदान नाही, अशी भूमिका घेतली हाेती. मात्र, मतदानासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन राजकीय पक्षाच्यावतीने करण्यात येत आहे. तसेच ओबीसी समाजातून उमेदवारी देण्याचा प्रयत्नही सुरू आहे. त्यामुळे नाराज ओबीसी समाज काेणती भूमिका घेताे हे महत्त्वाचे ठरणार आहे.
ओबीसींच्या रद्द झालेल्या जागांवर हाेत असलेल्या निवडणुकीत भाजप ओबीसी समाजातीलच व्यक्तींनाच उमेदवारी देणार आहे. ओबीसी समाजावर झालेला अन्याय या माध्यमातून दूर करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
- सुनील मेंढे,
खासदार
पहिल्या टप्प्यातील निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील निवडणुकीच्या उमेदवारीबाबत विचार केला जाईल. शक्यताे ओबीसी समाजातील व्यक्तींना उमेदवारी दिली जाईल.
- नाना पंचबुद्धे,
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी
काॅंग्रेसचे आधीच ठरलेले उमेदवार सर्वसाधारण प्रवर्गातून उभे राहतील. ओबीसी प्रवर्गासाठी काॅंग्रेसने उमेदवार निवडले हाेते. त्यांचा पुन्हा संधी दिली जाईल. ओबीसींवर हाेणारा अन्याय दूर करण्यासाठी काॅंग्रेस प्रयत्न करीत आहे.
- माेहन पंचभाई,
जिल्हाध्यक्ष, काॅंग्रेस