ओबीसींना मक्तेदारी समजू नका!
By admin | Published: November 15, 2016 12:29 AM2016-11-15T00:29:27+5:302016-11-15T00:29:27+5:30
संविधानाने देऊ केलेले अधिकार स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही ओबीसींना मिळालेले नाही.
खुशाल बोपचे : लाखनी-साकोलीतील बैठकीतील सूर
लाखनी : संविधानाने देऊ केलेले अधिकार स्वातंत्र्याच्या ६९ वर्षांनंतरही ओबीसींना मिळालेले नाही. ओबीसींना न्याय देणारा विधेयक संसदेत सादर करण्याची वेळ आली तेव्हा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी ते समंत होऊ दिले नाही. परिणामी ओबीसींची प्रगती खुंटली. आज प्रत्येक राजकीय पक्ष हा ओबीसींना आपली मक्तेदारी समजत आला आहे. ती राज्यकर्त्यांनी समजू नये, असे सांगून आता ओबीसी आघाड्या सक्रीय होऊ लागल्यामुळे ही ओबीसी आंदोलनाच्या यशाची सुरूवात आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राजकीय पक्ष समन्वयक माजी खासदार डॉ.खुशाल बोपचे यांनी केले.
भंडारा जिल्हा ओबीसी संघर्ष कृती समिती व राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्यावतीने लाखनी येथे आयोजित सभेत बोलत होते. यावेळी ओबीसी महासंघाचे जीवन लंजे, खेमेंद्र कटरे, डॉ.अजय तुमसरे, राजेश बांते, श्रावण कापगते, राजु कामथे, प्रशांत वाघाये, उमेश सिंगनजुडे, भुपेश वाघाये, भाष्कर गिहेपुंजे, डॉ.अतुल दोनोडे, प्रदीप मासुरकर, केवळराम लांजेवार, उमेश भांडारकर, नंदलाल गभणे, लिलाधर पटले, छाया पटले, प्रकाश करंजेकर, विष्णु रणदिवे, निर्मला कापगते, सावित्रीदेवी बोपचे, नरेंद्र वाडीभस्मे उपस्थित होते.
यावेळी राजेश बांते म्हणाले, ओबीसी समाजाला जागृत करण्यासाठी गावागावात ओबीसी संघटनेची शाखा बांधणी आवश्यक आहे. ओबीसीवर दाखल होणारे खोटे अॅट्रासिटीच्या गुन्ह्याचा तपास योग्यरितीने करून ओबीसीवर अन्याय होणार नाही, याची काळजी सरकारने घेण्याची गरज आहे.
जीवन लंजे म्हणाले, पाच दिवसापासून साकोली विधानसभा क्षेत्रातील गावागावात जाऊन ओबीसी संघटनेच्या बैठकांची माहिती देण्यात आल्यामुळे लोकांना आपण ओबीसी असल्याची जाणीव होऊ लागली आहे. त्यामुळे लोकच समोर येत आहेत. डॉ.अजय तुमसरे म्हणाले, साकोली विधानसभा क्षेत्रातील प्रत्येक गावात ओबीसी संघर्ष कृती समिती व राष्ट्रीय ओबीसी महासंघ पोहोचविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ८ डिसेंबरचा महामोर्चा यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर बैठका घेऊन नियोजन करण्यात येणार आहे.
यावेळी भोयर म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून आम्ही काम करीत आहोत परंतु जनतेकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही, परंतु यावेळी सर्वच राजकीय पक्ष मतभेद बाजुला सारून एकत्र येत असल्याने हे आंदोलन यशस्वी होण्यास सहकार्य मिळेल. यावेळी खेमेंद्र कटरे म्हणाले, ८ डिसेंबरचा मोर्चा हा राजकीय पक्षाच्या विरोधात नसून राज्यघटनेनेने दिलेल्या अधिकारासाठी आहे. २७ नोव्हेंबरच्या महिला महाधिवेशनातही महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले. प्रा.झिंगरे यांनी मार्गदर्शन केले.
बैठकीला दिनेश खोटेले, गोवर्धन बोपचे, गिरीश यावलकर, राहुल तवाडे, उमेश कठाणे, सुशील बनकर, युवराज कापगते, प्रमोद आकरे, सुनिल रूखमोडे, आशिक गणवीर, उमेश भांडारकर, व्ही.एन.खोटेले, विजय चांदेवार, लिलाधर पटले, हेमराज चांदेवार, सोमेश्वर धांडे, सुधिर काळे, लक्ष्मण बावनकुळे, विशाल हटवार, गंगाधर लुटे, आनंदराव उरकुडे, पांडुरंग खंडाईत, प्रफुल खेडीकर, भास्कर गिहेपुंजे, उमराव आठोडे, विनोद वरकड, अशोक गायधनी, माधवराव भोयर, संजय लोहबरे, एस.एम.वनवे, नंदलाल काडगाये, यशवंत लोहबरे, जितेंद्र फसाटे यांच्यासह लाखनी व साकोली तालुक्यातील ओबीसी बांधव उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)