ओबीसींचा खासदारांच्या घरासमोर ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2021 04:13 AM2021-08-02T04:13:07+5:302021-08-02T04:13:07+5:30
संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री नित्यानंद राय यांनी ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात येणार नाही, असे जाहीर केले. ...
संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री नित्यानंद राय यांनी ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्यात येणार नाही, असे जाहीर केले. याबाबीचा निषेध म्हणून ओबीसी जनगणना परिषद, ओबीसी सेवा संघ व इतर ओबीसी संघटनांच्या वतीने रविवारी सकाळी ८.३० ते १० वाजेपर्यंत खासदार सुनील मेंढे यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले. ओबीसींसाठी मंत्रालय सुरू करावे, ही मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलनात माजी खासदार मधुकर कुकडे यांनी मार्गदर्शन केले. या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. डाॅ. मुकेश पुडके, समन्वयप्रमुख सदानंद इलमे यांनी केले.
या आंदोलनात भय्याजी लांबट, मंगला वाडीभस्मे, अनिता बोरकर, उमेश सिंगनजुडे, आनंदराव उरकुडे, श्रद्धा गायधने, प्रमोद सिंगनजुडे, संजय मते, डाॅ. गणवीर, भाऊराव रंगारी, भगीरथ थोटे, के.झेड. शेंडे, गोपाल सेलोकर, डाॅ. बाळकृष्ण सार्वे, मुरलीधर भर्रे, मनोज बोरकर, पांडुरंग पुडके, पंकज पडोळे, माधव फसाटे, धनराज झंझाड, संगीता धांडेकर, शोभा बावनकर, दिलीप गभणे, महादेव खोकले, सुरेश बोरकर, राधेश्याम खोब्रागडे, ॲड. धर्मेंद्र अग्रवाल, प्रभा कळंबे, संजीव बोरकर, आर.बी. बालपांडे, श्रीकृष्ण पडोळे, वसंत काटेखाये, रूपचंद रामटेके आदी सहभागी झाले होते. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
बाॅक्स
खासदारांनी स्वीकारले निवेदन
ठिय्या आंदोलनाला खासदार सुनील मेंढे यांनी भेट दिली. ओबीसी जनगणना परिषदेचे निवेदन स्वीकारले. यावेळी ओबीसी जनगणना परिषदेच्या विद्यार्थ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.