सिहोऱ्यात शेतकऱ्यांकडून रोहयो कामाची अडवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 05:00 AM2020-06-09T05:00:00+5:302020-06-09T05:00:31+5:30

मात्र शेतकऱ्याने अडचण निर्माण केल्याने या मजूरांना कामावरुन परतावे लागले. खरीप हंगामात या पांदन रस्त्याने साहित्य ने-आण करताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. पांदन रस्त्याचे मातीकाम जानेवारी महिन्यातच सुरु करण्याची गरज होती. मात्र आता कामाला उशिर झाल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात त्रास होणार असल्याने शेतकऱ्याने काम थांबविले आहे.

Obstruction of Rohyo work by farmers in Sihora | सिहोऱ्यात शेतकऱ्यांकडून रोहयो कामाची अडवणूक

सिहोऱ्यात शेतकऱ्यांकडून रोहयो कामाची अडवणूक

Next
ठळक मुद्दे७०० मजूर कामावरुन परतले : खरीप हंगाम जवळ आल्याचे सांगितले कारण

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : खरीप हंगामात अडचण येणार असल्याचे कारण सांगुन सिहोरा येथे पांदण रस्त्याचे मातीकाम गावातील काही शेतकऱ्यांनी अडविले. त्यामुळे गावातील ७०० मजुरांना कामावरुन परतावे लागले. सिहोरा येथे ग्रामपंचायत अंतर्गत महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे काम सुरु करण्यात आले होते. गावातील पतीराम बिजेवार यांच्या शेतापासून ते नहरापर्यंत पांदन रस्त्याच्या मातीकामाला मंजूरी मिळाली होती. त्यामुळे गावातील मजूरात आनंदाचे वातावरण होते. मातीकामाकरिता दुसऱ्या दिवशी गावातील मजूर कामावर हजर झाले.
पांदन रस्त्यालगत असणाऱ्या शेतातून मातीकाम खोदकाम सुरु झाले. यावेळी कामावर ७०० मजूर उपस्थित होते.
मात्र शेतकऱ्याने अडचण निर्माण केल्याने या मजूरांना कामावरुन परतावे लागले. खरीप हंगामात या पांदन रस्त्याने साहित्य ने-आण करताना शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागणार असल्याचे शेतकऱ्याने सांगितले. पांदन रस्त्याचे मातीकाम जानेवारी महिन्यातच सुरु करण्याची गरज होती. मात्र आता कामाला उशिर झाल्याने शेतकऱ्यांना पावसाळ्यात त्रास होणार असल्याने शेतकऱ्याने काम थांबविले आहे.
गावात मजुरांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी ग्रामपंचायतच्या पुढाकारात काम सुरु झाले होते. मात्र काम बंद झाल्याने पुन्हा मजुरांवर संकट कोसळले आहे. काम बंद झाल्याने मजूर संतप्त झाले आहेत. ग्राम पंचायत प्रशासनाकडून पुन्हा नवीन कामे सुरु करण्याची माहिती दिली जात आहे.

शेतकºयांना अडचण येणार असल्याने पांदन रस्त्याचे मातीकाम थांबवले आहे. मात्र रोहयो काम सुरु करण्याच्या प्रयत्नात आहे.
-मधु अडमाचे,
सरपंच सिहोरा
पांदन रस्त्याचे मातीकाम मंजूर करताना शेतकऱ्यांची संमती घेणे गरजेचे होते. मात्र तसे करण्यात न आल्याने मजुरांना कामावरुन परतावे लागले आहे.
- राजकुमार मोहनकर,
सामाजिक कार्यकर्ता सिहोरा

Web Title: Obstruction of Rohyo work by farmers in Sihora

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Labourकामगार