रस्त्यावरील वाहतुकीसाठी बेवारस वाहनांचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:34 AM2021-05-16T04:34:37+5:302021-05-16T04:34:37+5:30
बॉक्स अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर भंडारा शहरातील काही रस्त्यांच्या कडेला अशी बेवारस वाहने दिसून येतात. रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही ...
बॉक्स
अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
भंडारा शहरातील काही रस्त्यांच्या कडेला अशी बेवारस वाहने दिसून येतात. रस्त्याच्या कडेला उभी असलेली ही वाहने अपघाताला आमंत्रण देत आहेत. त्यामुळे येथे अस्वच्छता पसरत असून, परिसराचे विद्रूपीकरण झाले आहे. याव्यतिरिक्त या गाड्यांच्या सभोवताली घाण वाढत असून ही वाहने अपघाताला आमंत्रण देतात. यासोबतच येथे असामाजिक तत्त्वांचा वावर वाढण्याची भीती परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
बॉक्स
अनेक वर्षांपासून वाहने एकाच जागेवर
भंडारा शहरातील तुकडोजी वाॅर्डात खुल्या जागेत अनेक वर्षांपासून एक वाहन बेवारस स्थितीत धूळ खात पडलेले आहे. मात्र हे वाहन कोणाचे आहे, कधीपासून आहे याबाबत कल्पना नाही. त्यामुळे एकाच जागेवर पडून असणाऱ्या अशा वाहनांचा प्रश्न शहरात गंभीर रूप धारण करीत आहे. यासाठी नगर परिषदेने शोधमोहीम राबविण्याची गरज आहे.
कोट
भंडारा शहरात काही रस्त्यांवर, घरांसमोर वाहने लावलेली असतात. त्यामुळे विनाकारण जागा अडवली जात असल्याने वाहतुकीस अडथळा ठरताे. शिवाय वाहने काढण्यास सांगितले असता अनेकदा वाद होतात. वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या अशा वाहनांवर कारवाई करण्याचा नगर परिषदेला अधिकार असताना याकडे दुर्लक्ष होत आहे.
- विवेक मेश्राम, तरुण, भंडारा