शासकीय सुट्टीच्या दिवशी दुय्यम निबंधक कार्यालय सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:35 AM2021-03-21T04:35:01+5:302021-03-21T04:35:01+5:30
भंडारा : शासनाने ३१ मार्च २०२१पर्यंत विक्रीपत्र, बक्षीसपत्र, फलोपयोगी गहाणखत व भाडेपट्टा (९० वर्षांवरील मुदतीकरिता) अशी दस्त नोंदणी केल्यास ...
भंडारा : शासनाने ३१ मार्च २०२१पर्यंत विक्रीपत्र, बक्षीसपत्र, फलोपयोगी गहाणखत व भाडेपट्टा (९० वर्षांवरील मुदतीकरिता) अशी दस्त नोंदणी केल्यास नगर परिषद व प्रभाव क्षेत्रासाठी ४ टक्के व ग्रामीण क्षेत्रासाठी ३ टक्के मुद्रांक शुल्कात सवलत घोषित केलेली आहे. या सवलतीमध्ये नोंदणी कार्यालयात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी दस्त नोंदणीची सुविधा भंडारा जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक वर्ग - २ कार्यालय, भंडारा व दुय्यम निबंधक श्रेणी - १ कार्यालय, तुमसर येथे २७ मार्च रोजी शनिवारी सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्यात येणार आहे. हे दस्ताचे मुद्रांक शुल्क ३१ मार्चपूर्वी भरल्यास व दस्त निष्पादन ३१ मार्चपर्यंत केल्यास संबंधित दस्तऐवज नोंदणीसाठी चार महिने चालेल. या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग - १ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी रवींद्र के. पाटील यांनी केले आहे.