अधिकारी, कर्मचाऱ्यांविना पंचायत समिती वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 01:13 AM2018-05-06T01:13:21+5:302018-05-06T01:13:21+5:30

मोहाडी पंचायत समितीत ४ मे रोजी कार्यालये सुरू झाल्यापासून ३.३० वाजतापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संप दिसून आला. एकाही विभागातील अधिकारी व कर्मचारी आपल्या टेबलवर दिसून आले नाही.

Officers, employees without the Panchayat Committee on the wind | अधिकारी, कर्मचाऱ्यांविना पंचायत समिती वाऱ्यावर

अधिकारी, कर्मचाऱ्यांविना पंचायत समिती वाऱ्यावर

Next
ठळक मुद्देमोहाडी प्रभारी बिडीओंचे कर्मचाऱ्यांना अभय : चौकशी करण्याची उपसभापती उमेश पाटील यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी / करडी : मोहाडी पंचायत समितीत ४ मे रोजी कार्यालये सुरू झाल्यापासून ३.३० वाजतापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संप दिसून आला. एकाही विभागातील अधिकारी व कर्मचारी आपल्या टेबलवर दिसून आले नाही. विशेष म्हणजे पंचायत समितीचे खंड विकास अधिकारीही कार्यालयात नव्हते. त्याचा फायदा घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणत्याही रजा न घेता कार्यालयाकडे पाठ फिरविली. पंचायत विभागातील विस्तार अधिकारी वगळता संपूर्ण विभागात ठणठणाट दिसून आला.
यावेळी उपस्थित उपसभापती उमेश पाटील यांनी आपणही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हिटलरशाहीने त्रस्त असल्याचे सांगत प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे.
४ मे रोजी मोहाडी पंचायत समितीमध्ये १२ वाजतापर्यंत दोन कर्मचारी वगळता बाकीचे सर्व कर्मचारी गैरहजर दिसून आले. याबाबत कर्मचारी वरगंटीवार यांना उपसभापती उमेश पाटील यांनी विचारणा केली असता कर्मचारी कुठे गेले माहिती नाही, असे उत्तर दिले. याबाबतची माहिती उपसभापती उमेश पाटील यांनी उपमुख्य कार्यालय अधिकारी मंजुषा ठवकर व मुख्य कार्यपालन अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांना याबाबत माहिती दिली.
कर्मचारी व अधिकारी गैरहजर असल्याबाबतचे सांगितले. त्याचवेळी कक्ष अधिकारी चौधरी यांना बोलाविले असता कोणतेच अधिकारी हजर नव्हते. फक्त काळसर्पे व वरगंटीवार हजर होत्या. तसेच दोन पंचायत विस्तार अधिकारी हजर होते. कृषी विभागातील एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते.
बांधकाम विभातही एक अधिकारी व कर्मचारी हजर नव्हते. परंतू २ वाजता कक्ष अधिकारी एच.एच. चौधरी हजेरी बुक घेवून उपसभापतींच्या कक्षात आले असता ३० कर्मचाऱ्यांपैकी १६ कर्मचाऱ्यांच्या हजेरी बुकवर हजेरी असल्याचे सांगितले. तसेच चार कर्मचारी दौºयावर आणि ५ कर्मचारी सुट्टीचा अर्ज न देता गैरहजर असल्याचे सांगितले. विशेष म्हणजे याबाबतची माहिती होताच कर्मचाºयांनी येवून स्वाक्षऱ्या केल्याचे दिसून येते.
अधिकारी कर्मचाऱ्यांविना मोहाडी पंचायत समिती वाऱ्यावर असल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला हे विशेष.

अधिकारी व कर्मचाऱ्यांविनालोकांना आल्यापावली कामे न होता परतावे लागले. गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या संबंधाने कोणतीही माहिती दिलेली नाही. रजा घेतलेल्या नाहीत. जि.प. च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली आहे. अधिकारी व कर्मचारी मनमर्जीपद्धतीने येथे काम करीत आहेत.
-उमेश पाटील, उपसभापती पं.स. मोहाडी.
वरिष्ठांना माहिती देवून नागपूरला आहे. मात्र, उपमुख्य कार्यपालन अधिकारी यांचे सुचनेनुसार गैरहजर असणाऱ्या अधिकारी व कर्मचाºयांची माहिती गोळा करून अहवाल जिल्हा परिषदेला पाठविण्यास कक्ष अधिकारी चौधरी यांना सांगितले आहे. अहवाल तयार करणे सुरू आहे. तत्काळ उपमुख्य कार्यपालन अधिकारी मंजुषा ठवकर यांचेकडे अहवाल सोपविला आहे.
-रविंद्र वंजारी, प्रभारी खंड विकास अधिकारी मोहाडी.

Web Title: Officers, employees without the Panchayat Committee on the wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.