रेती तस्करांच्या दंबगिरीला अधिकारीच जबाबदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:34 AM2021-02-13T04:34:32+5:302021-02-13T04:34:32+5:30

साकोली : तालुक्यात संघटना अवैध रेती तस्करी व तस्करांची दबंगगिरीची चर्चा सुरू आहे. तालुक्यात उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, ...

Officials are responsible for the arrogance of sand smugglers | रेती तस्करांच्या दंबगिरीला अधिकारीच जबाबदार

रेती तस्करांच्या दंबगिरीला अधिकारीच जबाबदार

Next

साकोली : तालुक्यात संघटना अवैध रेती तस्करी व तस्करांची दबंगगिरीची चर्चा सुरू आहे. तालुक्यात उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, ठाणेदार व त्यांचे अधिनस्त असलेले कर्मचाऱ्यांची मोठी फौज असताना रेतीतस्करांची दबंगगिरी कशी काय चालते, हा प्रश्नच आहे. तर अधिकाऱ्यांच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या प्रकारामुळे ही दबंगगिरी सुरू आहे, अशीही चर्चा आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे सोनेगाव प्रकरण.

तीन दिवसांपूर्वी तालुक्यातील सोनेगाव गेटवर एकोडी सर्कलमधील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या पथकाने अवैधरित्या रेती भरून येणाऱ्या एका ट्रकला पकडले. त्याचा पंचनामा करून साकोलीला घेवून येत असताना ट्रकमालकाच्या दबंगगिरीचा प्रत्यय आला. ट्रकमालकाने दादागिरी करीत सदर रेतीचा भरलेला ट्रक घटनास्थळावरून नेवून वाटेत खाली केला. पथकाने घटनेची माहिती तहसीलदार यांना दिली. यावेळी नायब तहसीलदार मडावी फौजफाट्यासह घटनास्थळावर पोहोचले. त्यांनीही घटनास्थळावर खाली केलेल्या रेतीचा पंचनामा करू. सदर प्रकरण तहसीलदारांना पाठविले. घटनेला तीन ते चार दिवसांचा कालावधी लोटला असला तरी ट्रक तहसील कार्यालयात लावला नाही.

बॉक्स

ट्रक मोहाडीचा

एकोडी सर्कलच्या मंडळ अधिकारी व तलाठी यांनी पकडलेल्या रेतीच्या ट्रकचा नंबर त्यांच्याजवळ असून सदर ट्रक हा मोहाडीचा असल्याची माहिती आहे. सदर प्रकरण ट्रकचा नंबर, ट्रकमध्ये भरलेली रेती व खाली करण्यात आलेली रेती यांच्या फोटो पुराव्यासह असतानी महसूल विभाग कार्यवाही का करत नाही?

बॉक्स

पोलिसांत तक्रार नाही

रेतीतस्करांनी महसूल विभागाच्या पथकातून सदर ट्रक पळवून नेला व वाटेत खाली केला. या सर्व प्रकरणाचे साक्षीदार एकोडीचे मंडळ अधिकारी व पाच तलाठी असताना सदर ट्रक जप्त करण्यासंदर्भात तहसीलदारांनी पोलिसांत तक्रार दिली नाही, असा प्रश्न आहे.

बॉक्स

साकोलीत ट्रकवर कार्यवाहीच नाही

मागील बऱ्याच दिवसांपासून साकोली महसूल विभागातर्फे फक्त अवैधरित्या रेती तस्करी ट्रकवर कार्यवाही करण्यात येत आहे. मात्र, रेतीच्या ट्रकवर कार्यवाहीच केली जात नाही. हा भेदभाव कशाच्या भरवशावर केला जात आहे. हे सोनेगावच्या प्रकरणावरून नक्कीच उघडकीस आले आहे.

बॉक्स

एक महिन्याआधीही हीच घटना

एक महिन्याआधीही अशीच घटना घडली. एकोडीजवळ काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रेतीचा ट्रॅक्टर पकडला व तो साकोली येथे आणत असताना बोधरा फाट्यानजीक सेटिंग करून सदर ट्रॅक्टरमधील रेती खाली करून ट्रक्टर पळविण्यात आला. याही प्रकरणाची तक्रार पोलिसांत तर नाहीच तसेच तहसील कार्यालयातही नाही.

Web Title: Officials are responsible for the arrogance of sand smugglers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.