अधिकाऱ्यांनी जाणली ‘ग्रामस्वराज अभियाना’ंची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:45 AM2018-04-20T00:45:03+5:302018-04-20T00:45:03+5:30
जिल्ह्यातील ग्रामस्वराज्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या खुटसावरी गावाला दिल्ली येथील सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी डॉ. संदिप सिंह यांनी गुरुवारी भेट देऊन अधिकारी- पदाधिकाऱ्यांकडून अभियानाच्या कामांची माहिती जाणून घेतली.
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्ह्यातील ग्रामस्वराज्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या खुटसावरी गावाला दिल्ली येथील सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी डॉ. संदिप सिंह यांनी गुरुवारी भेट देऊन अधिकारी- पदाधिकाऱ्यांकडून अभियानाच्या कामांची माहिती जाणून घेतली. त्यांनी पदाधिकाºयांशी चर्चा करून योजना शास्वत राहण्याकरिता अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.
भंडारा तालुक्यातील खुटसावरी येथे ‘ग्रामस्वराज अभियान’ अंतर्गत १४ एप्रिल ते ५ मे दरम्यान 'सबका साथ सबका ग्राम सबका विकास' या धर्तीवर प्रधानमंत्री उज्वला योजना, सौभाग्य (प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना) उजाला योजना, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, मिशन इंद्रधनुष्य या योजनांची विशेष अंमलबजावणी कटाक्षाने राबविण्यात येत आहे.
राबविलेल्या कामांची पाहणीकरिता खुटसावरी येथे गुरुवारला सकाळी १० वाजताच्या सुमारास दिल्ली येथील सामाजिक न्यायचे अधिकारी डॉ. संजय सिंह यांनी भेट दिली. त्यानंतर ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित अधिकारी, कर्मचारी व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी अभियानांतर्गत राबविण्यात येत असलेल्या कामांची माहिती जाणून घेतली. य्
ाावेळी सरपंच विजय वासनिक यांनी गावाची लोकसंख्या १,११० असून कुटूंब संख्या २८४ तर घराची संख्या आहे. १४ एप्रिलपासून आजपर्यंत ग्रामस्वराज अभियानांतर्गत आखून दिलेल्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य दिले जात आहेत. या अभियानात अधिकारी व कर्मचारी हिरिरीने सहभाग घेवून गावात जनजागृती करीत असल्याचे सांगितले.
यावेळी डॉ. संजय सिंग यांनी ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या व्हिजीट बुकवर गावातील योजनांच्या कामाविषयी समाधानकारक असल्याचे नमूद केले. उपस्थित अधिकाऱ्यांना व पदाधिकाऱ्यांना गावातील प्रत्येक नागरिकांना योजनाचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही डॉ. सिंह यांनी केले.
यावेळी विस्तार अधिकारी बडगे उपमुख्यकार्यकारी अधिकारी कार्यालयातील प्रतिनिधी धारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. सरिता मालडोंगरे, एस. व्ही. ठमके, ए. एस. कानतोडे, आर. बी. मेश्राम, व्ही. व्ही. कांबळे, के. व्ही. तुमडाव, आशावर्कर सुजाता साखरे, ग्रा.पं. सदस्य प्रियंका टेंभुर्णे, छाया वाहने, शिपाई रुस्तम टेंभुर्णे, विनोद बोरकर आदी उपस्थित होते.