जुनी पेन्शन, मागण्यांसाठी विमाशिची धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:22 AM2021-07-05T04:22:18+5:302021-07-05T04:22:18+5:30
कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागणीसह कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबाला ५० लाखांचे विमा संरक्षण देऊन ...
कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे या प्रमुख मागणीसह कोरोनाने मृत्यू झालेल्या शिक्षकांच्या कुटुंबाला ५० लाखांचे विमा संरक्षण देऊन अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देणे, प्रलंबित महागाई भत्त्याची थकबाकी, सातव्या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्ता अदा करणे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाशिवाय विनाअट मंजूर करणे, भविष्य निर्वाह निधी परतावा / नापरतावा, वैद्यकीय देयके, अर्जित रजा रोखीकरणाकरिता बीडीएस प्रणाली सुरू करणे, नक्षलग्रस्त भागात कार्यरत कर्मचाऱ्यांना एक स्तर पदोन्नती व वाढीव घरभाडे भत्ता लागू करणे, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध ११ डिसेंबर २०२०चा आदेश रद्द करणे, राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करणे. नगर परिषद शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना लागू करणे आदी पस्तीस मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.
माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, भंडारा यांच्यामार्फत शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन विमाशि संघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर देशमुख, जिल्हा कार्यवाह राजेश धुर्वे, चंद्रशेखर रहांगडाले, टेकचंद मारबाते, पुरुषोत्तम लांजेवार, धीरज बांते, मनोज अंबादे, जागेश्वर मेश्राम, भाऊराव वंजारी, शालिकराम खोब्रागडे आदींनी केले आहे.